---Advertisement---

एआर रेहमानच्या गाण्यावर थिरकला केपी, थेट रेहमाननेच केला व्हिडीओ शेअर

On: बुधवार, मे 13, 2020 2:23 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरस या साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनमुळे खेळाडू सोशल मीडियाकडे वळले आहेत. आता इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनदेखील टिक-टॉकवर व्हिडिओ बनवला आहे.

पीटरसनने प्रसिद्ध गायक आणि संगीतकार एआर रेहमानच्या (AR Rahman) ‘ओट्टागथा कट्टिको’ या तमिळ गाण्यावर डान्स केला. पीटरसनचा हा टिक-टॉक व्हिडिओ रेहमानला खूप आवडला आहे. तसेच त्याने त्याचा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CADeYv1g5CT/

या व्हिडिओच्या सुरुवातीला पीटरसन (Kevin Pietersen) केवळ मान हलवताना गाण्याचे बीट पकडतो. परंतु काही वेळातच तो पुढे थिरकण्यास सुरुवात करतो. पीटरसनचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. तसेच चाहत्यांकडून त्याच्या व्हिडिओला पसंती मिळत आहे.

याव्यतिरिक्त पीटरसनने आणखी एक विचित्र टिक-टॉक व्हिडिओ शेअर केला आहे. यावर ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने कमेंट करत लिहिले होते की, “मला वाटत होते की, केवळ मीच वेडा झालो आहे.”

https://www.instagram.com/p/CACkJkklCQ4/

सध्या परदेशी खेळाडू टॉलिवूडकडे आकर्षित होताना दिसत आहेत. यापूर्वी  वॉर्नरनेही तमिळ आणि तेलुगू गाण्यावर डान्स करत टिक-टॉक व्हिडिओ बनविला आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-एका टी२० सामन्यात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारे ५ फलंदाज

-धोनी आज जो आहे तो केवळ ‘त्या’ गोष्टींमुळेच

-एकाच दिवसात दोन वेळा पुर्ण टीम बाद होण्याच्या ४ घटना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---