एकदिवसीय क्रिकेट हे क्रिकेटचे मध्यम प्रारूप म्हणून ओळखले जाते. कसोटी क्रिकेट काहीसे रटाळवाणे वाटू लागल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात झाली. १९७३ ला एकदिवसीय क्रिकेट खेळायला सुरू केलेल्या भारतीय संघाने १९८३ ला विश्वचषक देखील जिंकला. १९९९ नंतर २००७ पर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये राज्य केले. दुसरीकडे, क्रिकेटचा जन्मदात्या इंग्लंडला विश्वचषक जिंकण्यासाठी २०१९ पर्यंत वाट पाहावी लागली
टी२० क्रिकेटच्या प्रभावाने एकदिवसीय क्रिकेट देखील वेगवान बनले. प्रेक्षकांनाही पूर्वीपेक्षा जास्त करमणूक मिळू लागली. सामने रंगतदार होऊ लागले. आता, अफगाणिस्तान सारखा नवखा संघ पाकिस्तान, वेस्टइंडीज सारख्या दिग्गज संघांना हरवत आहे. आयर्लंडने इंग्लंडला विश्वचषकात हरवण्याची किमया देखील केली आहे. पण, काही संघांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या पहिल्या विजयासाठी अनेक वर्ष वाट पहावी लागली होती.
आज आम्ही तुम्हाला अशाच दोन संघांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना आपल्या पहिल्या एकदिवसीय विजयासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागली.
१) झिम्बाब्वे
९० च्या दशकात दर्जेदार खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या झिम्बाब्वे संघाचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो. १९८३ साली झिम्बाब्वे संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखल झाला. त्यानंतर, १० वर्षात १८ एकदिवसीय सामने खेळताना त्यांना सर्वच्या सर्व सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यानंतर, १९८३ विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला हरवून त्यांनी उलटफेर करत आपला पहिलावहिला एकदिवसीय विजय मिळवला.
पुढच्या काळात, झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये कमालीची सुधारणा झाली. फ्लॉवर बंधू, हेन्री ओलोंगा, नील जॉन्सन, एलिस्टर कॅम्पबेल, हॅमिल्टन मासाकात्झा, ब्रेंडन टेलर यांसारखे गुणवान क्रिकेटपटू झिम्बाब्वेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दिले.
२) बांगलादेश
सर्वाधिक काळ एकदिवसीय विजय मिळवू न शकलेला संघ म्हणजे भारताचा शेजारी बांगलादेश. बांगलादेशने १९८६ ते १९९८ या काळात सलग २२ एकदिवसीय पराभव स्वीकारले आहेत. केनियाविरुद्ध पहिला विजय मिळाल्यानंतरही, १९९९ ते २००२ या काळात पुन्हा बांगलादेशने सलग २३ सामने गमावले होते. तसेच फेब्रुवारी ते नोव्हेंबर २००३ दरम्यानही बांगलादेशने सलग १८ पराभव पाहिले.
सध्या बांगलादेश क्रिकेट भल्याभल्या संघांना पाणी पाजत आहे. त्यांनी, २०१५ क्रिकेट विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरी तर २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीत उपांत्य फेरीतपर्यंत मजल मारली होती.
ट्रेंडिंग लेख –
…आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली
आचरेकर सर म्हणत, “प्रवीण हा सचिनपेक्षा काकणभर सरस आहे”
क्रिकेटला रामराम केल्यावर मॅनेजमेंटची डिग्री घेऊन अमेरिकन एक्सप्रेससाठी काम करणारा क्रिकेटर
महत्त्वाच्या बातम्या –
शतकांच्या शतकाचं इंजिन आज जोडलं गेलं होतं, याचदिवशी सचिनने केलं होतं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक
ब्रॅडमन यांची सरासरी १०० न होण्यामागे त्यांचा संघसहकारी खेळाडूच देतोय स्वत:लाच दोष
दोन पुणेकर क्रिकेटर पोहचले चेन्नईला, सीएसकेच्या सराव शिबीरात घेणार भाग