बुधवारी (७ ऑक्टोबर) अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर आयपीएलच्या तेराव्या हंगामातील २१वा सामना झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात कोलकाता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात १० बाद १६७ धावा केल्या.
दरम्यान रवींद्र जडेजा आणि फाफ डू प्लेसिस यांनी कोलकाताच्या सुनील नरेनचा खूप अनोखा आणि अप्रतिम झेल पकडला. झाले असे की, कोलकाताचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (१२ चेंडू ११ धावा) आणि नितीश राणा (१० चेंडू ९ धावा) डावातील ९ षटकांच्या आतच बाद झाले. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर नरेन फलंदाजीसाठी आला होता.
नरेनने २ षटकात एक चौकार आणि एक षटकार मारत १५ धावांची ताबडतोब खेळी केली. त्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने डावातील ११वे षटक टाकण्यासाठी कर्ण शर्माला पाठवले. शर्माच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर नरेनने शॉट मारला. पण मीड विकेटकडे उभा असलेल्या रविंद्र जडेजाने कमालीची डाइव्ह घेत चेंडू पकडला. पण घसरत त्याचा हात सीमारेषेला स्पर्श करेल तोपर्यंत त्याने समोर उभा असलेल्या फाफ डू प्लेसिसकडे चेंडू फेकला आणि त्याने चेंडू पकडत नरेनला झेलबाद केले.
Stunning catch by jaddu n Faf 🔥💯.
World's top 2 fielders @imjadeja @faf1307 #CSKvsKKR #jadeja #FafduPlessis pic.twitter.com/uztjldNtVo— Sanket Bhavar (@SanketBhavar4) October 7, 2020
Stunning catch by jaddu n Faf 🔥💯.
World's top 2 fielders @imjadeja @faf1307 #CSKvsKKR #jadeja #FafduPlessis pic.twitter.com/uztjldNtVo— Sanket Bhavar (@SanketBhavar4) October 7, 2020
https://twitter.com/live_cricvideos/status/1313859100812296192
जडेजा आणि डू प्लेसिसच्या गजब झेलमुळे नरेन ९ चेंडूत १७ धावा करत पव्हेलियनला परतला. त्याच्यानंतर कोलकाता संघाच्या कोणत्याही फलंदाजाला २० धावादेखील करता आल्या नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई विरुद्ध कोलकाता: २०१५ नंतर पहिल्यांदाच टॉस जिंकत केकेआरने केली प्रथम फलंदाजी करण्याची हिम्मत
७३ वर्षातही तुम्हाला ‘ही’ गोष्ट शिकता आली नाही, मंकडींगवरुन गावसकरांचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना टोला
थेट तामिळ चित्रपटात काम करुन सर्वांनाच सुखद धक्का देणारा बड्डे बॉय ब्राव्हो
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यात होऊ शकतात ‘हे’ ५ खास विक्रम
IPL 2020: हीच ती ३ कारणे, ज्यामुळे राजस्थानला पहावे लागले पराभवाचे तोंड
टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा आकडा पार करणारे ३ भारतीय क्रिकेटर