आयपीएलने काही वर्षातच जगभरात आपली लोकप्रियता मिळवली आहे. आता तर जगभरातील श्रीमंत लीगमध्ये आयपीएलची गणना देखील होते. आयपीएलमुळे अनेक क्रिकेटपटूंना त्यांची क्षमता, कौशल्य दाखवण्यासाठी मोठे माध्यमही मिळाले.
त्याचबरोबर अनेक क्रिकेटपटू आयपीएलमुळे करोडपतीही झाले, मग ते क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले असो वा देशांतर्गत स्तरावर.
7 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला जयदेव उनाडकटसाठी राजस्थान रॉयल्सने २०१८ आयपीएल लिलावात एकूण 19.9 कोटी रुपये मोजले होते. यावर्षी आयपीएल होईल की नाही याबद्दल जरी शंका असली तरीही यापुर्वीच्या १२ आयपीएलमधून सर्वाधिक कमाई केलेले खेळाडू
आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई केलेल हे आहेत टॉप खेळाडू-
5. गौतम गंभीर – डिसेंबर 2018मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला गौतम गंभीर आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलमध्ये 94.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकता नाईट रायडर्सने आत्तापर्यंत 2 वेळा विजेतेपद मिळवले आहे. 2018मध्ये गंभीर दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळला. दिल्लीने त्याच्यासाठी 2018 च्या आयपीएल लिलावात 2 कोटी रुपये मोजले होते. तसेच त्याला कर्णधारही केले होते. पण त्याने पहिल्या 6 सामन्यानंतर कर्णधारपद सो़डले होते.
4. सुरेश रैना – मिस्टर आयपीएल म्हणून ओळख असणाऱ्या सुरेश रैनाने प्रत्येक आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा आहे. त्याचबरोबर त्याच्यानावावर अनेक विक्रमही आहेत. त्याने आयपीएलमधून 99.7 कोटींची कमाई केली आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्सने याही वर्षी संघात कायम केले आहे.
3. विराट कोहली – सध्याचा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणारा विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 126.2 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कोहलीला 2018 या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 17 कोटी रुपये मोजत संघात कायम केले होते.
तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्यामध्ये अव्वल क्रमांकावर आहे. एक फलंदाज म्हणून जरी कोहलीने चांगली कामगिरी केली असली तरी त्याच्या नेतृत्त्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मात्र आत्तापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही.
2. रोहित शर्मा – मुंबई इंडियन्सला तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माने आयपीएलमधून 131.8 कोटींची कमाई केली आहे. त्याला 2018 या वर्षी मुंबईने 15 कोटी रुपयांमध्ये कायम केले होते.
त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबईने 2013, 2015, 2017 आणि 2019 असे चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. त्याचबरोबर रोहित हा आयपीएलमध्ये कोहली आणि रैना नंतर सर्वाधिक धावा करण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
1 एमएस धोनी – आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार असणारा एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्स संघाची धूरा समर्थपणे पेलली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली प्रत्येक आयपीएल मोसमात चेन्नईने बाद फेरीत प्रवेश केला आहे.
धोनीला २०१८ या वर्षी चेन्नईने 15 कोटी रुपयांमध्ये संघात कायम केले होते. त्याने आत्तापर्यंत आयपीएमध्ये 137.8 कोटींची कमाई केली आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली 2018 या वर्षी चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते. याआधी त्याच्या नेतृत्वाखाली 2010 आणि 2011 असे दोनवर्षी आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते.
क्रिकेटवरील ‘गोष्ट एका क्रिकेटरची’ लेखमालेतील अन्य लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालेतील काही खास लेख-
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर