ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषक 2022 साठी वेस्ट इंडिजने बुधवारी (14 सप्टेंबर) 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. निकोलस पूरन या संघाचे नेतृत्त्व करणार आहे. तर आक्रमक फलंदाज रोवमन पॉवेल याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे योग्य मिश्रण असल्याचे वेस्ट इंडिजच्या निवड समितीच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.
क्रिकेटरसिंकाना मात्र आगामी टी20 विश्वचषकात या स्पर्धेचा मोठा अनुभव असलेल्या काही खेळाडूंची कमी जाणवेल. कायरन पोलार्ड(Kieron Pollard), ड्वेन ब्रावो (Dwyane Bravo), ख्रिस गेल (Chris Gayle), आंद्रे रसेल (Andre Russell) आणि सुनिल नारायण (Sunil Narine) हे ते खेळाडू आहेत. या 5 स्टार क्रिकेटपटूंविना पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ टी20 विश्वचषक खेळेल.
कायरन पोलार्ड, ड्वेन ब्रावो यांसारखे स्टार क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले असल्याने ते यावर्षी टी20 विश्वचषक खेळताना दिसणार नाहीत. मागील टी20 विश्वचषक 2021 मध्ये वेस्ट इंडिजच्या संघाचे प्रदर्शन फार वाईट राहिले होते. वेस्ट इंडिजचा संघ साखळी फेरीतूनच बाहेर झाला होता. यानंतर स्टार वेगवान गोलंदाज ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. ब्रावोने वेस्ट इंडिजकडून 2007, 2009, 2010, 2012, 2014, 2016 आणि 2021 सालचा टी20 विश्वचषक खेळला होता.
तर धाकड फलंदाज कायरन पोलार्डने एप्रिल 2022 मध्ये अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानेही 4 टी20 विश्वचषकात वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्त्व केले होते. 2009, 2010, 2012 आणि 2021च्या टी20 विश्वचषकाचा तो भाग होता.
मात्र माजी क्रिकेटपटू ब्रावो आणि पोलार्ड यांच्याव्यतिरिक्त काही दिग्गज क्रिकेटपटूंना टी20 विश्वचषकातून वगळण्याचा आश्चर्यकारक निर्णय वेस्ट इंडिजने घेतला आहे. घातक अष्टपैलू आंद्रे रसेल याला टी20 विश्वचषकासाठी दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे. त्याच्यासाठी मागील काही दिवस चांगले राहिलेले नाहीत. कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये त्रिनबागो नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्त्व करताना 4 डावात त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी फक्त 17 धावांची राहिली आहे. याच खराब फॉर्ममुळे त्याच्यावर दुर्लक्ष करण्यात आले आहे.
मात्र रसेलला 4 टी20 विश्वचषकांचा अनुभव आहे, जो वेस्ट इंडिज संघासाठी फायदेशीर ठरला असता. त्याने 2012, 2014, 2016 आणि 2018 सालचे टी20 विश्वचषक खेळले होते. तर फिरकीपटू सुनिल नारायण हा गेल्या 3 वर्षांपासून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे त्यालाही आगामी टी20 विश्वचषकासाठी प्राधान्य देण्यात आले नाही. नारायणने वेस्ट इंडिजकडून 2012 आणि 2014 सालचे टी20 विश्वचषक खेळले होते.
शिवाय टी20 विश्वचषकांचा सर्वाधिक अनुभव असलेला ख्रिस गेलही वेस्ट इंडिजच्या संघाचा भाग नाही. गतवर्षीच्या टी20 विश्वचषकानंतर त्याने जास्त क्रिकेटही खेळलेले नाही. मात्र त्याचा विश्वचषकांचा अनुभव दांडगा आहे. 2007, 2009, 2010, 2012, 2014, 2016 आणि 2021 असे 7 टी20 विश्वचषक तो खेळला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्वागत नहीं करोगे! भारतासाठी ऑस्ट्रेलिया टीमने भरली उड्डाण, विमानातील फोटो केलाय शेअर
VIDEO | टी20 विश्वचषकासाठी बूम बूम बुमराह सज्ज, तास-न्-तास करतोय सराव
तब्बल 231 सामन्यांमध्ये अंपायरिंग करणाऱ्या पंचाचे आकस्मिक निधन, क्रिकेटविश्व शोकसागरात