पुणे । पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 18 ते 20मे 2019 रोजी मेट्रोसिटी स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लब, कोथरूड येथे पार पडणार आहे.
स्पर्धेत एकूण 210हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.