क्रिकेटच्या १४३ वर्षांच्या इतिहासात अनेक महान गोलंदाज होऊन गेले. या महान गोलंदाजांची गोलंदाजींमध्ये बरीच मोठी नावं आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्वरुपाविषयी म्हणजे कसोटी क्रिकेटविषयी बोलायचं झालं तर, काही यशस्वी गोलंदाजांनी बऱ्याच विकेट्स मिळवून विक्रम केले आहेत.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकाचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने सर्वाधिक ८०० विकेट्स घेणाचा पराक्रम केला आहे. तर, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नचा या यादीत क्रमांक लागतो. त्याने कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. तर, नुकताच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार अजहर अलीची विकेट घेत, कसोटीत ६०० विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर विराजमान झाला आले. अंडरसनच्या आधी तिसऱ्या स्थानावर भारताचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे विराजमान आहे. त्याने कसोटीत ६१९ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
६०० कसोटी विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर असणारे मुरलीधरन, वॉर्न, कुंबळे हे तिघेही फिरकीपटू आहेत. त्यामुळे अँडरसन हा एकमेव वेगवान गोलंदाज या यादीत आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये वसीम अक्रम, चामिंडा वास, ग्लेन मॅकग्रा आणि कपिल देव यांसारखे उत्तमोत्तम वेगवान गोलंदाज होऊन गेले, परंतु या दिग्गज गोलंदाजांना ६०० विकेट्सचा आकडा गाठता आला नाही. यांच्याप्रमाणेच कसोटी इतिहासात ३ असे वेगवान गोलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांनी अँडरसनपुर्वी त्यांच्या कसोटीतील ६०० विकेट्सचा आकडा पार केला असता. पण, त्यांना झालेल्या दुखापती त्यांच्या या विक्रमासमोरील सर्वात मोठा शत्रू बनल्या.
या लेखात, त्याच ३ वेगवान गोलंदाजांची माहिती देण्यात आली आहे, ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अँडरसनच्या आधी ६०० विकेट्स घेतल्या असत्या. 3 Fast Bowlers Could Have Taken 600 Test Wickets Before James Anderson
ऍलन डोनाल्ड –
दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्ड याची कसोटी कारकिर्द केवळ १० वर्षांची राहिली. १९९२ पासून ते २००२ पर्यंत त्याने ७२ कसोटी सामने खेळले. दरम्यान त्याने दमदार प्रदर्शन करत ३३० विकेट्स घेतल्या.
डोनाल्डला त्यावेळचा सर्वात तूफानी वेगवान गोलंदाज समजले जात असायचे. मात्र, आपल्या पूर्ण कसोटी कारकिर्दीत दुखापतींमुळे त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. शेवटी आपल्या दुखापतींना कंटाळून त्याने वयाच्या ३५व्या वर्षी २००२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. जर, दुखापतींमुळे त्याच्या कारकिर्दीत अडथळे निर्माण झाले नसते, तर अजून काही वर्षे त्याने कसोटी क्रिकेट खेळले असते आणि अँडरसनपुर्वी त्याने ६०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आपल्या नावाचा समावेश केला असता.
कर्टली अँम्ब्रॉस –
वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज गोलंदाज कर्टली अँम्ब्रॉसलाही त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागला. याच कारणामुळे त्याची कसोटी कारकिर्द केवळ १२ वर्षांची राहिली. १९८८ साली कसोटी क्रिकेटमध्ये आपले पहिले पाऊल ठेवणाऱ्या कर्टलीने २०००पर्यंत ९८ सामने खेळले. दरम्यान त्याने २.३०च्या इकोनॉमी रेटने ४०५ विकेट्सची आपल्या खात्यात नोंद केली.
मात्र, १९९५नंतर कर्टलीला दुखापतींमुळे बऱ्याचदा संघाबाहेर रहावे लागले. जर, त्याच्या मार्गात दुखापती अडथळा ठरल्या नसत्या तर त्याने ६०० कसोटी विकेट्सचा आकडा गाठला असता. आणि आज कसोटीत ६०० विकेट्स पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत त्याचे नाव असते.
डेल स्टेन –
दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. २००७ साली न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून या गोलंदाजाने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. आतापर्यंत त्याने कसोटीत ९३ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ४३९ विकेट्सची आपल्या खात्यात नोंद केली आहे. पण दुखापतींमुळे तो सतत संघातून आतबाहेर होत राहिला. नाहीतर त्यानेही जेम्स अँडरसनपुर्वी त्याच्या कसोटीतील ६०० विकेट्सचा आकडा गाठला असता.
ट्रेंडिंग लेख –
रंगअंधत्व असतानाही मोठी कारकिर्द घडवणाऱ्या ख्रिस राॅजर्सबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?
भल्याभल्या गोलंदाजांना धूळ चारणाऱ्या रोहितची फलंदाजी ‘या’ ४ गोलंदाजांपुढे पडते फिकी
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी क्रिकेटमध्ये एका योग्यासारखा, या भारतीय दिग्गजाने व्यक्त केले मत
मैदानावर उतरताच ‘हा’ खेळाडू म्हणतोय, आता तुरुंगातून सुटल्यासारखे वाटत आहे…
शोएब अख्तरची ‘या’ खेळाडूवर कडाडून टीका; म्हणाला, तो हरवलेल्या गायीसारखा…