आधुनिक क्रिकेटमध्ये मोठ्या फटक्यांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्याचे फलंदाज वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न करतात आणि या प्रयत्नात मोठे फटके खेळण्यास ते जराही मागे- पुढे पाहत नाहीत. टी२० क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकार खेचणे सामान्य आहे. परंतु त्याचा परिणाम म्हणून वनडे क्रिकेटमध्येही चौकार-षटकारांची आतिषबाजी होताना दिसत असते. टी२० क्रिकेटला सुरुवात होण्यापूर्वी, वनडे क्रिकेटमध्ये ३०० धावा ही खूप मोठी धावसंख्या मानली जायची. मात्र, आता टी२० क्रिकेटच्या प्रभावाने वनडे क्रिकेटमध्ये ३०० धावांचे आव्हान लीलया पार केले जाते.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यादरम्यानच्या वनडे मालिकेला २७ नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांत काही असे फलंदाज आहेत, जे मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. भारतीय संघात शिखर धवन, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या असे फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत. भारतीय संघाचा नियमित उपकर्णधार रोहित शर्माला दुखापतीमुळे वनडे आणि टी २० मालिकेमधून विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पंड्या, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांच्यावर भारतीय संघाकडून षटकार मारण्याची सर्वाधिक जबाबदारी असेल.
आज आम्ही तुम्हाला अशा तीन भारतीय फलंदाजांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका वनडेत सर्वाधिक षटकार मारले आहेत.
३) विराट कोहली
सध्याच्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ २०१३ मध्ये सात सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. त्या मालिकेतील जयपूर येथील सामन्यात विराटने तुफानी शतकी खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५० धावांचा पाठलाग करताना विराटने ५२ चेंडूत १०० धावांची स्फोटक खेळी करून भारताला विजयी केले होते. विराटने या खेळीदरम्यान ८ चौकार व ७ उत्तुंग षटकार ठोकले होते.
२) सचिन तेंडुलकर
सन १९९८ मधील पेप्सी कप या तिरंगी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आले होते. रिकी पॉंटिंग व टॉम मूडी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २२२ धावा उभ्या केल्या होत्या. प्रत्युत्तरात, सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर यांनी भारतीय संघाला शानदार सलामी दिली. सचिन तेंडुलकरने ८९ चेंडूत १०० धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीमध्ये सचिनने ८ षटकार लगावले होते. सचिनच्या या खेळीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला होता.
१) रोहित शर्मा
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याची कामगिरी सलामीवीर रोहित शर्माने केली आहे. २०१३ मध्ये बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रोहितने १५८ चेंडूत २०९ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. रोहितचे हे पहिले वनडे द्विशतक होते. रोहितने आपल्या या तुफानी खेळीत १६ गगनचुंबी षटकार मारत विक्रम रचला होता. हा सामनाही भारतीय संघाने ५७ धावांनी जिंकला होता.
ट्रेंडिंग लेख-
‘या’ ३ भारतीय शिलेदारांचा असू शकतो अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा; दुसरे नाव आश्चर्यकारक
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात खेळलेल्या लक्ष्मणच्या पाच ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खेळ्या
किती हे दुर्देव! उत्कृष्ट कामगिरी करूनही टीम इंडियात स्थान टिकवू न शकलेले ३ भारतीय खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! रोहित आणि ईशांत शर्मा पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातून बाहेर?
टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश