ऍडलेड। भारताचा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 299 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक केले आहे.
त्याने या सामन्यात 112 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. त्याचे हे वनडे क्रिकेटमधील 39 वे शतके आहे. त्याने हे शतक 108 चेंडूतच पूर्ण केले होते.
तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीतही दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने हे शतक त्याच्या वनडेमधील 210 व्या डावात केले आहे.
त्यामुळे वनडेत सर्वात जलद 39 शतके करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर झाला आहे. याआधी सचिनने 350 डावात 39 शतके केली होती. यापेक्षा तब्बल 140 डाव कमी खेळत विराटने हा टप्पा गाठला आहे.
विराटने आज या सामन्यात रोहित शर्माबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 54 धावांची, अंबाती रायडूबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची आणि एमएस धोनीबरोबर चौथ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–बापरे! सलग तीन वर्ष किंग कोहलीला संक्रांत पावली, विरोधी संघावर आणली संक्रांत
–ना सौरव, ना धोनी; परदेशात कोहलीच आहे किंग
–विराट एक्सप्रेस सुसाट, संगकाराचा विक्रमही मोडला