माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना जम्मू-काश्मीरमध्ये वंचित मुलांना शिकण्याची संधी देऊन क्रिकेटला प्रोत्साहन देऊ इच्छित आहे. गेल्या महिन्यात रैनाने जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांना पत्र लिहून क्रिकेट अकादमी सुरू करण्याची विनंती केली होती.
तर शुक्रवारी जम्मू-काश्मीर प्रशासनाने रैनाची विनंती स्वीकारली असून, जम्मू-काश्मीरमध्ये आता चार क्रिकेट अकादमी उघडल्या जाणार आहेत. यावर्षी स्वातंत्र्यदिना दिवशी रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट केले की, “माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मुख्य क्वार्टरमध्ये डीजीपीची भेट घेतली आणि काही क्रिकेट संघासह काश्मिर खोऱ्यात मुलांच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असलेल्या योजनांवर चर्चा केली. त्याचबरोबर त्यानी काही क्रिकेट संघाना क्रिकेट विषयी माहिती देखील दिली”
https://twitter.com/manojsinha_/status/1307005029379760128
https://twitter.com/manojsheeri/status/1306942922357530624
https://twitter.com/ImRaina/status/1306953184720625664
रैनानेही त्यांच्या ट्विटला रिट्विट केले आणि लिहिले की “मी जम्मू-काश्मीरच्या मुलांच्या भविष्याला आकार देण्याचा विचार करीत आहे.”
रैनाने काय केलं होतं अपील
रैनाने जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांना पत्र लिहिले होते, ज्यात तो म्हणाला होता की, “खेळाला काहीतरी परत द्यायचे आहे. मी १५ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माझा ठसा उमटवला आहे आणि म्हणूनच मला माझा अनुभव आणि क्षमता पुढील पिढीला द्यायची आहे.”
अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देणारा रैना म्हणाला की ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालयांमध्ये खेळाला प्रोत्साहन द्यायचे आहे. तो म्हणाला की, केंद्रशासित प्रदेशातील ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे हेच माझं लक्ष्य आहे.
https://twitter.com/ImRaina/status/1306897110009348096
त्याने आपल्या पत्रात लिहिले की, “मला या भागात विविध शाळा आणि महाविद्यालयातील प्रतिभावान तरुण खेळाडू शोधायचे आहेत. क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही तर ही एक अशी प्रक्रिया आहे जी व्यावसायिक दृष्टीकोन, शिस्त, तंदुरुस्त, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहून लोकांना आकार देऊन, सुधारू शकते.”
https://twitter.com/AdityaRajKaul/status/1306907837432360960
गेल्या महिन्यातही जम्मू-काश्मीर पोलिसांनी रैनाला क्रिकेटच्या युक्त्या शिकवण्यासाठी आमंत्रित केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-सीएसकेसाठी आनंदाची बातमी! पहिल्या सामन्याआधी क्वारंटाईनमधून बाहेर आले हे ३ दिग्गज खेळाडू
-‘या’ ६ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल आजच्या आयपीएल सामन्याचा निकाल
-आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला आली लसिथ मलिंगाची आठवण म्हणाला…
ट्रेंडिंग लेख-
-पहिलाच सामना जिंकायला धोनी ‘या’ ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात
-जेव्हा जेव्हा मुंबई इंडियन्स पहिला सामना खेळलीय, तेव्हा तेव्हा पहा काय लागलाय स्पर्धेचा निकाल
-जेव्हा जेव्हा चेन्नई पहिला सामना खेळलीय, तेव्हा तेव्हा पहा काय लागलाय स्पर्धेचा निकाल






