---Advertisement---

संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज, ज्यांनी शेवटच्या षटकात दिल्या ६ पेक्षाही कमी धावा

---Advertisement---

वनडे क्रिकेट सामन्यातील अंतिम षटक पाहण्याची वेगळीच मजा असते. वनडे क्रिकेटमध्ये असे अनेकदा पाहायला मिळाले आहे की, अंतिम षटकात फलंदाज दमदार फटकेबाजी करत १५-२० धावा करतात. तसे तर, कोणत्याही क्रिकेट सामन्यात दर्शकांचा उत्साह पाहायला मिळतो. परंतु, जर शेवटच्या षटकात फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकण्यासाठी जास्त धावांची आवश्यकता असेल, तर सामना पाहण्याची रोमांचकता दुप्पटीने वाढते. पण, अशा निर्णायक घडीला विरुद्ध संघातील गोलंदाजाची खरी परीक्षा असते. कारण, त्याच्या गोलंदाजीवर संघाची हार-जीत निर्भर असते.

या लेखात अशा दबावातील परिस्थितीतही उत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणाऱ्या काही गोलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या गोलंदाजांनी वनडे सामन्याच्या शेवटच्या षटकात विरुद्ध संघाला ६ धावाही न करु देत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.

तर बघूयात, कोण आहेत ते गोलंदाज – (5 Bowlers Who Defended Less Than 6 Runs IN Last Over Of ODI)

५. ख्रिस गेल (इंग्लंड विरुद्ध, ५ धावा)

ख्रिस गेलला त्याच्या विस्फोटक गोलंदाजीसाठी ओळखले जाते. परंतु, हा धाकड फलंदाजाने आपल्या गोलंदाजीने विरुद्ध संघातील फलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवण्याचेही काम केले आहे. २० जुलै २००० साली वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघात नॉटिंघम येथे एक सामना पार पडला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजने इंग्लंडला १९६ धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडने वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करताना ४९व्या षटकापर्यंत ७ विकेट्स गमावत १९० धावापर्यंतची मजल मारली होती.

परंतु, शेवटच्या षटकात गेलमुळे संपूर्ण डाव पालटला. गेलने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरच पॉल फ्रॅंकची विकेट घेतली. तर, तिसऱ्या चेंडूवर डॅरेन गॉफला त्रिफळाचीत आणि पाचव्या चेंडूवर ऍलन मुलालीला पायचीत केले. त्यामुळे ४९.५ षटकात १९२ धावांवर इंग्लंड संघ सर्वबाद झाला आणि वेस्ट इंडिजने ३ धावांनी तो सामना जिंकला.

४. इमरान खान (ऑस्ट्रेलिया विरुद्ध, ४ धावा)

पाकिस्तानचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू इमरान खान यांनी वर्ल्ड सीरीज १९९० मध्ये एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना शेवटच्या षटकात ४ धावा करु दिल्या नव्हत्या. झाले असे की, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाला २२१ धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. त्यांना सामन्यातील शेवटच्या षटकात विजयासाठी ४ धावांनी आवश्यकता होती. परंतु, शेवटचे षटक टाकणाऱ्या इमरान यांनी आपल्या रिव्हर्स स्विंग आणि यॉर्कर्सने ओडोनेल आणि रॅकरमन या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद केले होते. फक्त १ धाव देत त्यांनी हा कारनामा केला होता आणि पाकिस्तानला २ धावांनी तो सामना जिंकून दिला होता.

३. चार्ल लेंगवेल्ड (वेस्ट इंडिज विरुद्ध, ४ धावा)

२००५ साली ब्रिजटाऊन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात चार्ल लेंगवेल्डने अंतिम षटकात सलग ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या दमदार गोलंदाजी प्रदर्शनामुळे दक्षिण आफ्रिकाने तो सामना १ धावेने जिंकला होता. दक्षिण आफ्रिकाने दिलेल्या २८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला विजयासाठी शेवटच्या षटकात ४ धावांची आवश्यकता होती. चार्लने शेवटच्या षटकातील पहिल्या आणि दूसऱ्या चेंडूवर १-१ धाव दिली. वेस्ट इंडिजला आता ४ चेंडूत फक्त २ धावा घ्यायच्या होत्या आणि ३ विकेट्स बाकी होत्या. अशा कठीण परिस्थितीत चार्लने ३ चेंडूत सलग ३ विकेट्स घेत हारता सामना खिशात घातला होता.

२. ग्लेन मॅक्सवेल (पाकिस्तान विरुद्ध, २ धावा)

२०१४ साली अबू धाबी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात असे काही घडले, जे वनडे क्रिकेटच्या इतिहासात त्यापुर्वी फक्त एकदा घडले होते. पाकिस्तानला विजयासाठी २ धावांची गरज होती आणि २ विकेट्स बाकी होत्या. सर्वांना वाटत होते की, तो सामना पाकिस्तान संघच जिंकेल. परंतु, ग्लेन मॅक्सवेलने शेवटच्या षटकात एकही धाव न देता २ विकेट्स चटकावल्या आणि तो सामना जिंकला. शेवटच्या षटकातील दूसऱ्या चेंडूवर मॅक्सवेलने सोहेल तनवीर आणि सहाव्या आणि शेवटच्या चेंडूवर मोहम्मद इरफानला बाद केले होते.

१. क्रिस प्रिंगल (ऑस्ट्रेलिया विरुद्ध, २ धावा)

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने वनडेत केलेल्या पराक्रमापुर्वी न्यूझीलंडच्या क्रिस प्रिंगलने तो पराक्रम केला होता. १९९० साली त्यांनी हा पराक्रम केला होता. न्यूझीलंडने दिलेल्या १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने शेवटच्या षटकापर्यंत १९३ धावा केल्या होत्या. त्यांना विजयासाठी फक्त २ धावांची आवश्यकता होती. प्रिंगलने फलंदाजी करत असणाऱ्या ब्रूस रीडला सलग ५ मेडन चेंडू टाकले आणि शेवटच्या चेंडूवर रीडला बाद केले. क्रिसच्या या पराक्रमामुळे न्यूझीलंडने तो सामना एका धावेने जिंकला.

(महत्त्वाचे – ग्लेन मॅक्सवेल आणि क्रिस प्रिंगल हे २ असे गोलंदाज आहेत, ज्यांनी वनडे सामन्याच्या शेवटच्या षटकात केवळ २ धावांचे रक्षण केले आहे.)

ट्रेंडिंग लेख –

भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर

आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी

क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही

महत्त्वाच्या बातम्या –

ज्या दिवशी आयपीएलचा सामना होणार नाही, त्या दिवशी खेळाडू करणार काय? फ्रेंचायझींपुढचा सर्वात मोठा प्रश्न

विराट कोहलीला अटक करण्याची मागणी, मद्रास हायकोर्टात याचिका दाखल

मयंक-रोहित नाही तर ही आहे सध्याची सर्वोत्तम सलामी जोडी, भारताच्या ह्या माजी क्रिकेटरचे मत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---