साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी ६०वी धाव घेत विराटने एक खास पराक्रम केला.
इंग्लंडमध्ये एकाच कसोटी मालिकेत ५०० धावा करणारा तो केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
हा पराक्रम करण्यासाठी विराटला आज केवळ १४ धावांची गरज होती. विराटने लंचपुर्वी १० तर लंचनंतर ४ धावा करत हा कारनामा केला.
विराट सध्या या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
द्रविडने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या ६०२ धावा या यादीत अव्वल क्रमांकावर आहेत. तसेच या विक्रमाच्या यादीत पहिल्या ५ खेळाडूंमध्ये द्रविडचे नाव दोन वेळा आहे. द्रविडने २०११ च्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेतही ४६१ धावा केल्या होत्या.
त्याचबरोबर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी १९७९ मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत ५४२ धावा केल्या होत्या.
गेल्याच सामन्यात विराटने इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले होते.
सचिनने १९९६ ला झालेल्या कसोटी मालिकेत ४२८ धावा केल्या होत्या. यात त्याने दोन शतके आणि १ अर्धशतक केले होते.
इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज-
६०२ धावा – राहुल द्रविड (२००२)
५४२ धावा – सुनील गावस्कर (१९७९)
५०० धावा – विराट कोहली (२०१८) (विराट सध्या खेळत असुन हा धरुन २ सामने बाकी आहेत.)
४६१ धावा – राहुल द्रविड (२०११)
४२८ धावा – सचिन तेंडुलकर (१९९६)
थोडसं खास-
जेव्हा १९३०मध्ये आॅस्ट्रेलिया इंग्लंड दौऱ्यावर आली होती तेव्हा सर डाॅन ब्रॅडमन यांनी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ७ डावात फलंदाजी करताना ९७४ धावा केल्या होत्या. कोणत्याही कसोटी मालिकेत, कोणत्याही देशात केलेल्या या सर्वोच्च धावा आहे.
एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताकडून सुनिल गावसकरांच्या नावावर आहे. त्यांनी १९७०-७१ला विंडीजविरुद्ध विंडीजमध्ये ४ कसोटीत ८ डावात फलंदाजी करताना ७७४ धावा केल्या होत्या. तसेच गावसकरांनी १९७८-७९मध्ये भारतात विंडीजविरुद्ध ६ सामन्यात ७३२ धावा केल्या होत्या तर विराटने बाॅर्डर -गावसकर मालिकेत आॅस्ट्रेलियात ४ सामन्यात ८ डावात फलंदाजी करताना ६९२ धावा केल्या होत्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–तरच टीम इंडिया जिंकणार चौथा कसोटी सामना…
–ड्वेन ब्रावोकडून टी२०त षटकारांची बरसात, केली धमाकेदार खेळी
–वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
–एशियन गेम्स: समारोप सोहळ्यासाठी हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल असणार ध्वजधारक