कोरोनाच्या सावटाखाली ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत भारतातील वेगवेगळ्या शहरात आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू होणार आहे. प्रत्येक देशातील प्रमुख खेळाडू आपला खेळ आयपीएलच्या मंचावर दाखवत असतात. क्रिकेट जगतातील सर्वात प्रसिद्ध अशा या स्पर्धेची प्रतिक्षा खेळाडू आणि प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने करत आहेत.
टी२० क्रिकेटमध्ये शतक ठोकणे म्हणजे त्या फलंदाजाकडे काहीतरी विशिष्ट कौशल्य असणे आवश्यक असते. टी२० मध्ये शतक ठोकले की, खेळाडूला वेगळाच भाव येतो. आयपीएलमध्ये आतापर्यंत बर्याच फलंदाजांनी शतके ठोकली आहेत. सचिन तेंडुलकर, ख्रिस गेल, महेला जयवर्धने अशा दिग्गजांसोबतच मनीष पांडे, पॉल वॉल्थाटी यासारख्या स्थानिक खेळाडूंच्या नावेदेखील आयपीएलमध्ये शतके आहेत.
आज आम्ही तुम्हाला, भारतीय फलंदाजानांकडून आयपीएलमध्ये ठोकलेल्या तीन वेगवान शतकांबद्दल सांगणार आहोत.
३) विराट कोहली
भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा व आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटच्या खात्यात आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक धावा जमा आहेत.
विराटने २०१६ आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळताना ४७ चेंडूत शतक साजरे केले होते. पावसामुळे प्रत्येकी पंधरा षटकांचा झालेल्या सामन्यात विराटच्या ५० चेंडूतील ११३ धावांमुळे बेंगलोरने २११ धावांचा डोंगर उभा केला होता. २०१६ च्या हंगामात विराटने चार शतके झळकावली होती.
२) मुरली विजय
आयपीएलमध्ये भारतीयांकडून दुसरे सर्वात जलद शतक मुरली विजयच्या नावे आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेल्या विजयने आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स व किंग इलेव्हन पंजाब या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
विजयने २०१० आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध ४६ चेंडूत शतक झळकावले होते. विजयने त्या सामन्यात ५७ चेंडूत १२७ धावांची तुफानी खेळी केली होती. त्याच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने २४६ धावा फलकावर लावल्या होत्या.
३) युसुफ पठाण
आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक काढणारा भारतीय म्हणजे युसुफ पठाण. भारताचा पहिला टी२० सुपरस्टार असलेल्या युसुफने, आयपीएलमध्ये आपल्या आक्रमक खेळाने खूप नाव कमावले होते.
२०१० आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना युसुफ पठाणने अवघ्या ३७ चेंडूत विस्फोटक शतक झळकावले होते. युसुफच्या शतकानंतरही राजस्थानला एका धावेने पराभव स्विकारावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार, बघा रोहित-धोनीसोबत आहे कोणाचे नाव
आयपीएल २०२१: सर्वाधिक धावांसाठी ‘या’ चार खेळाडूंमध्ये रंगणार स्पर्धा, विराट आहे बराच पुढे