वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. या मालिकेसाठी 11 महिन्यानंतर पुनरागमन करत असलेल्या जसप्रीत बुमराह याच्याकडे संघाचे नेतृत्व दिले आहे. हा दौरा जवळ आलेला असतानाच आता भारतीय संघाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ आयर्लंडमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी जवळपास सर्वच अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली तसेच उपकर्णधार हार्दिक पंड्या हे या संघाचा भाग नाहीत.
या व्यतिरिक्त भारतीय संघाचा मुख्य सपोर्ट स्टाफ देखील संघासोबत असणार नाही. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड तसेच गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी या दौऱ्यातून विश्रांती घेतली होती. या पार्श्वभूमीवर संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघासोबत जातील अशी चर्चा सुरू होती. मात्र, एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हेदेखील भारतीय संघासोबत आयर्लंड दौऱ्यावर जाणार नाही. भारतीय संघाचे मॅनेजर असलेली व्यक्ती संघाची संपूर्ण जबाबदारी घेईल. तसेच, एनसीएतील काही प्रशिक्षक भारतीय संघाला मार्गदर्शन करतील.
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ:
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
(VVS Laxman will also not be traveling with Jasprit Bumrah-led India team on the 3-T20I Ireland tour)
महत्वाच्या बातम्या –
मोहम्मद आमिर संघात परतणार का? वर्ल्डकप 2023 पूर्वी पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी केले मोठे वक्तव्य
विश्वचषकात शिखर धवन पार पाडू शकतो प्रमुख भूमिका, आकडेवारी वाचून कळेल महत्व