पुणे| सत्य प्रकाश जोशी ग्रुप यांच्या तर्फे 5व्या एसपीजे करंडक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत एसपीजे ग्रुप संघाने अर्न्स्ट अँड यंग संघाचा तर टीसीएस संघाने वेंकीज् संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
व्हेरॉक क्रिकेट मैदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत एसपीजे ग्रुप संघाने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत अर्न्स्ट अँड यंग संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना वरूण गुजर नाबाद 98 धावांसह अर्न्स्ट अँड यंग संघाने 20 षटकात 2 बाद 160 धावा केल्या. वरूणने 66 चेंडूत नाबाद 98 धावा केल्या मात्र त्याच्या या धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत व 160 धावांचे आव्हान सपीजे ग्रुप संघाने केवळ 17 षटकात 3 बाद 161 धावा करून पुर्ण करत विजय मिळवला. यात मंदार भंडारीने 29 चेंडूत 55 तर दिव्यांग हिंगणेकरने नाबाद 49 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. उत्कृष्ट कामगिरीमुळे पराभूत संघाच्या वरूण गुजर याला सामनावीर घोषित करण्यात आले.
दुस-या लढतीत टीसीएस संघाने वेंकीज् संघाचा 18 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना राहूल गर्गच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीसीएस संघाने 20षटकात 5 बाद 179 धावा केल्या. 179 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मयंक जासोरे, अभिनव कालिया, गौरव सिंग व सुनिल बाबर यांच्या आचूक गोलंदाजीपुढे वेंकीज् संघ 18.4 षटकात सर्वबाद 161 धावांत गारद झाला. 30 धावांत 3 गडी बाद करणारा मयंक जासोरे सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
अर्न्स्ट अँड यंग- 20 षटकात 2 बाद 160 धावा(वरूण गुजर नाबाद 98(66), चिन्मय जोशी नाबाद 23(19), जतीन कजानी 16(24), संजय जोशी 1-19, सुरज शिंदे 1-29) पराभूत वि एसपीजे ग्रुप- 17 षटकात 3 बाद 161 धावा(मंदार भंडारी 55(29), दिव्यांग हिंगणेकर नाबाद 49(39), सुरज शिंदे नाबाद 27(8), संजय जोशी 14(16), रविंद्र चौहाण 1-45, शुभम उपाध्याय 1-19) सामनावीर- वरूण गुजर(कामगिरीवरून)
एसपीजे ग्रुप संघाने 7 गडी राखुन सामना जिंकला.
टीसीएस- 20षटकात 5 बाद 179 धावा(राहूल गर्ग नाबाद 56(32), गौरव भालेराव 31(28), मयंक जासोरे 29(14), विक्रमजीत सिंग 27(22), गौरव सिंग 17(12), विपुल खैरे 2-24, मयुर टिंगरे 1-28, सागर बिरडवडे 1-13) वेंकीज्- 18.4 षटकात सर्वबाद 161 धावा(सागर बिरडवडे 46(29), प्रसन्न मोरे 30(16), आदित्य कदम 25(16), मयंक जासोरे 3-30, अभिनव कालिया 2-36, गौरव सिंग 2-16, सुनिल बाबर 1-34)सामनावीर- मयंक जासोरे
टीसीएस संघाने 18 धावांनी सामना जिंकला.