चौदा वर्षाखालील विम्बल्डन स्पर्धेत भारताची एकमेव टेनिसपटू सहभागी झाली. तिचे नाव ऐश्वर्या जाधव. कोल्हापूरच्या या मुलीने पहिल्याच सामन्यात आपला उत्तम खेळ केला आहे. तिच्या विम्बल्डनमधल्या प्रवेशाचे भारतीय टेनिस चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुक केले आहे.
ऐश्वर्याने पहिल्या फेरीत अल्जेरियाच्या मारिया बदचे हिचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र तिला दुसऱ्या फेरीत ४-६,१-६ असे फ्रान्सच्या स्कार्लेट हेथेरिंगटनकडून पराभूत व्हावे लागले. तरीही तिने आत्मविश्वास न गमावता पुढच्या सामन्यांमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला आहे.
ऐश्वर्याला नंतर झालेल्या राउंड रॉबिनच्या तीन सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या रोमानियाच्या ऍन्ड्रिया सोअर्स विरुद्ध तिला संघर्षपूर्ण लढतीत पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यामध्ये ऐश्वर्या पहिल्या सेटमध्ये ३-० अशी आघाडीवर होती. मात्र तिचा खेळ थोडा कमकुवत पडल्याने तिला ३-६, २-६ असे पराभूत व्हावे लागले.
पहिल्यांदाच ग्रासकोर्टवर खेळणाऱ्या ऐश्वर्याने म्हटले, खेळ चांगली झाला, पण मी कुठेतरी कमी पडल्याने माधा पराभव झाला. मात्र या गोष्टी मी मनावर घेणार नाही. विम्बल्डनमध्ये ग्रास कोर्टवर खेळण्याचा अनुभव उत्कृष्ठ होता.
एकाही चॅनेलला ही बातमी दाखवलेली नाही.
कोल्हापूरची ऐश्वर्या जाधव १४ वर्षा खालील मुलांत
विंबल्डन मधे खेळत आहे. शेअर करा…. pic.twitter.com/2fCnxc9XCG— Dr prashant bhamare (@dr_prashantsb) July 10, 2022
ऐश्वर्याचे प्रशिक्षक अमृता बॅनर्जी यांनी तिच्या खेळीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, चौदा वर्षाखालील विम्बल्डन स्पर्धेत खेळणारी ऐश्वर्या कोल्हापूरच्या एकमेव खेळाडू होती. या स्पर्धेसाठी पात्र होणे हे आमच्यासाठी महत्वाचे होते. ऐश्वर्या सातत्याने अप्रतिम कामगिरी करत आहे.
फॉर्ममध्ये सातत्य राखत १३ वर्षाच्या ऐश्वर्याने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर १४ वर्षाखालील श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचण्याची कामगिरी केली आहे.
ऐश्वर्याला कसे मिळाले विम्बल्डनचे तिकिट-
दोन महिन्यांपूर्वी आयटीएफ (आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन) जागतिक १४ वर्षाखालील मुलींची टेनिस स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत भारतीय संघातून सहभागी झालेल्या ऐश्वर्याने ४ सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली होती. त्याच कामगिरीच्या जोरावर तिला विम्बल्डनचे तिकिट मिळाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडची झोप उडवणाऱ्या सूर्यकुमारलाच लागेना झोप! पत्नीने केला रात्रीचा व्हिडिओ शेअर
बाप तसा बेटा! बेकहमच्या फ्री-किक पुनरावृत्ती झाली त्याच्याच मुलाकडून, पाहा व्हिडिओ
वय केवळ आकडाच! ९४ वर्षाच्या भारतीय आजीबाईंचा परदेशात पराक्रम, सोनेरी यशासह मिळवली तीन पदकं