इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी डिसेंबर महिन्यात मिनी लिलाव आयोजित केला जाणार आहे. रविवारी (26 नोव्हेंबर) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. सनरायझर्स हैदराबाद संघाच्या काही महत्वाचे खेळाडू खेळाडू संघातून रिलीज म्हणजे पुढच्या हंगामासाठी संघातून वगळले आहेत.
इंग्लंडाचा युवा फलंदाज हॅरी ब्रुक याने मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडाक्यात पदार्पण केले. पण इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याला अपेक्षित पद्धतीने पदार्पण करता आले नाही. हॅरी ब्रुक याला सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल 2023 हंगामासाठी तब्बल 13.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. पण ब्रुक संघाच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. त्याने 11 सामन्यांमध्ये अवघ्या 190 धावा केल्या होत्या. अशात मागच्या काही दिवसांपासून हैदराबाद संघ ब्रुकबाबत काय निर्णय घेणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
रविवारी अखेर ब्रुक पुढच्या हंगामासाठी हैदराबाद संघात कायम नसेल, हे स्पष्ट केले गेले. हैदराबाद संघाने ब्रुकसह समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विवरान शर्मा, अकील हुसेन आणि आदील राशिद या खेळाडूंना रिलीज केले गेले.
सनरायझर्स हैदराबादने रिटेन केलेले खेळाडू –
अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, नितीशकुमार रेड्डी, शाहबाज अहमद, अभिषेक शर्मा, मार्को जॅन्सन, वॉशिंग्टन सुंदर, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, फजलहक फारुकी
सनरायझर्स हैदराबादने रिलिज केलेले खेळाडू –
हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विव्रत शर्मा, अकेल होसीन, आदिल रशीद.
(SRH have released Harry Brook Kartik Tyagi for IPL 2024 Auction)
महत्वाच्या बातम्या –
‘हा असेल भारताचा पुढचा मोहम्मद शमी,’ टीम इंडियाच्या ‘या’ गोलंदाजाबाबत अश्विनचं मोठं वक्तव्य
Mohammad Shami । वेगवान गोलंदाजाच्या गाडीसमोर भीषण अपघात! घाटातील रस्त्यावर काय घडले पाहाच