दुबई येथे झालेल्या आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने पाच गडी राखून सहज विजय मिळवत पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावले. त्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांनी मुंबई इंडियन्सला जगातील आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ठ टी -20 संघांपैकी एक म्हणून घोषित केले आहे
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार खेळाडू एबी डिविलियर्सनेही मुंबई इंडियन्सला आयपीएल 2020 चा सर्वोत्कृष्ट संघ जाहीर केले.
“मुंबई इंडियन्सची मस्त कामगिरी! यावर्षीचा सर्वोत्तम संघ यात काही शंका नाही, ” असे ट्विट डिविलियर्सने केले आहे.
Well done @mipaltan ! Without a doubt the best team this year. https://t.co/j9N2ns3Ozs
— AB de Villiers (@ABdeVilliers17) November 10, 2020
मुंबईने अंतिम सामन्यात दिल्लीला केले पराभूत –
आयपीएल २०२०च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला ५ विकेट्सने पराभूत केले. दिल्लीने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५६ धावा केल्या होत्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 65 धावा आणि रिषभ पंतने 56 धावा केल्या होत्या. त्यांच्याव्यतिरिक्त कोणालाही खास कामगिरी करता आली नाही. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने सर्वोत्तम कामगिरी करताना ३० धावांत ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी अशी ६८ धावांची खेळी केली. तर इशान किशनने नाबाद ३३ धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईने १५७ धावांचे आव्हान ५ विकेट्स गमावत आणि ८ चेंडू राखून सहज पार केले आणि पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी उचलली. पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी उचलणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
“…त्यामुळे भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिका सहज जिंकेल”, माजी कर्णधाराची भविष्यवाणी
हा तर भारताचा ‘मिस्टर 360’ ! हरभजनने केली ‘या’ क्रिकेटपटूची डिविलियर्सशी तुलना
रिकामी मैदाने असूनही आयपीएल २०२० ठरला आतापर्यंतचा सर्वात यशस्वी हंगाम
ट्रेंडिंग लेख –
…म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच!
…तेव्हा एमएस धोनीने केलेली ‘ती’ भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करून दाखवली!
…आणि हिटमॅन रोहित शर्मा झाला ‘स्टार क्रिकेटर’