इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल), ही एक अशी क्रिकेट स्पर्धा आहे, जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सक्रिय आणि निवृत्त झालेल्या खेळाडूंनाही खेळण्याची संधी मिळते. एवढेच नव्हे तर, राष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण न केलेल्या युवा खेळाडूंनाही फ्रंचायझी त्यांच्या संघात निवडतात. त्यामुळे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील वेगवेगळ्या संघांचे प्रतिभावान खेळाडू आयपीएलमध्ये त्यांची कमाल दाखवताना दिसतात.
मंगळवारी (२९ सप्टेंबर) अबु धाबी येथे खेळण्यात आलेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघातील सामन्यातूनही अशाच एका देशांतर्गत क्रिकेट संघातील युवा खेळाडूने आयपीएलमध्ये पदार्पण केले. हा खेळाडू म्हणजे, १९ वर्षीय फलंदाज ‘अब्दुल समद’.
आयपीएल २०२० लिलावात हैदराबाद संघाने समदला २० लाख रुपयांना विकत घेतले होते. परंतु आतापर्यंत हैदराबादने या हंगामातील खेळलेल्या २ सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नव्हती. मात्र दिल्लीविरुद्धच्या सामन्यात समदला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यामुळे त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.
यासह समद हा आयपीएलमध्ये खेळणारा जम्मू-काश्मिरचा तिसराच खेळाडू ठरला आहे. समदपुर्वी परवेज रसूल (२०१३-१६) आणि रसिक सलाम (२०१९) हे जम्मू-काश्मिरचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळले आहेत. तर मनजूर दार या जम्मू-काश्मिरी खेळाडूची २०१८ साली किंग्स इलेव्हन पंजाब संघात निवड झाली होती. पण अद्यापही त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
Special moment for Abdul Samad ????????pic.twitter.com/5wbrp6S9Zd
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 29, 2020
समदने त्याच्या पदार्पणाच्या आयपीएल सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत ७ चेंडूत १२ धावांची खेळी केली. यात त्याच्या १ चौकार आणि एका षटाकाराचा समावेश आहे. याव्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने १० प्रथम श्रेणी सामने खेळत ५९२ धावा, ८ अ दर्जाच्या सामन्यात २३७ धावा आणि ११ देशांतर्गत टी२० सामन्यात २४० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२०ने सोडली साथ, नाहीतर गेल्या १२ हंगामात खेळले होते ‘हे’ ५ शिलेदार
आमचं नाव तेव्हाही आणि आताही.! पाहा आयपीएलचा पहिला आणि तेरावा हंगाम खेळणारे ‘महारथी’
खबरदार! मिस्टर ३६० च्या हेल्मेटवर चेंडू माराल, तर…
ट्रेंडिंग लेख-
असा भारतीय खेळाडू ज्याने पाकिस्तानच्या खेळाडूंना आणले होते रडकुंडी
परिस्थितीने घडवलेला जगातील सर्वोत्तम ऑफस्पिनर, ज्याचा इकॉनॉमी रेट होता २ पेक्षाही कमी
क्या बात है! २००८ पासून आजपर्यंत ‘ते’ खेळत आहेत आयपीएल, हा विदेशी खेळाडूही यादीत