भारताच्या कसोटी संघातून बाहेर पडलेला अजिंक्य रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे नेतृत्व करत आहे. सध्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022-23चा हंगामात दुसऱ्या राऊंडचे सामने सुरू आहे. यातच मुंबई विरुद्ध हैद्राबाद (MUMvsHYD) सामन्यात रहाणेने शतकी खेळी केली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी भारतीय कसोटी संघाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. या सामन्यात त्याच्याव्यतिरिक्त यशस्वी जायसवाल यानेही शतकी खेळी केली आहे.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने हा भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार होता, मात्र नंतर त्याला पदावरून हटवण्यात आले आणि संघातूनही वगळले. यामुळे तो भारताच्या अनेक कसोटी सामन्यांना मुकला आहे. यातच त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये 121 चेंडूत शतकी खेळी करत राष्ट्रीय संघनिवड अधिकाऱ्यांना विचार करण्यास भाग पाडले आहे. तो मुंबईकडून सध्या 139 चेंडूत 108 धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहे. यासाठी त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्यासोबत सरफराज खान खेळपट्टीवर आहे.
या सामन्यात मुंबईच्या डावाची सुरूवात पृथ्वी शॉ आणि जायसवाल यांनी केली. शॉ 19 धावा करत बाद झाला. त्यानंतर जायसवालने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या साथीने संघाचा डाव सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 153 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार 80 चेंडूत 90 धावा करत तंबूत परतला. तो शतक करण्यास मुकला, कारण त्याला एम शशांकने पायचीत केले.
सूर्यकुमार बाद झाल्यानंतर जायसवाल आणि रहाणे यांनी मुंबईचा धावफलक हलता ठेवला. जायसवाल 195 चेंडूत 162 धावा केल्या. या खेळीत त्याने 27 चौकार एक षटकार मारला. तो बाद झाल्यावर संघाची स्थिती 3 बाद 382 अशी झाली होती. तत्पूर्वी त्याने रहाणेसोबत 206 धावांची भागीदारी केली.
रहाणेची कसोटी कारकिर्द पाहिली, तर त्याने आतापर्यंत 82 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 38.52च्या सरासरीने 4931 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 12 शतके आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. Ajinkya Rahane Century in Ranji Trophy 2022-23 vs Hyderabad
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्याची फलंदाजी पाहून विराटही झाला होता हैराण; म्हणाला, ‘तू काय व्हिडिओ गेम खेळतोय का?’
रणजी ट्रॉफीमध्ये सूर्याची तुफानी खेळी! 15 चौकार, एक षटकार मारूनसुद्धा चाहते निराश