Hardik Pandya Fit: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघातील खेळाडू दुखापतींचा सामना करत आहेत. वनडे मालिकेदरम्यान स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हादेखील दुखापतग्रस्त झाला. सूर्या घोट्याच्या दुखापतीमुळे दीड महिन्यासाठी संघाबाहेर होऊ शकतो. म्हणजेच, तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळू शकणार नाही. असे असले, तरीही टीम इंडियासाठी चांगली बातमी समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) अफगाणिस्तान संघाविरुद्धच्या टी20 मालिकेत पुनरागमनासाठी तयार आहे.
विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पंड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो विश्वचषकातून बाहेर पडला होता. तसेच, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही त्याने पुनरागमन न केल्यानंतर म्हटले जात होते की, हार्दिक अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतूनही बाहेर पडेल. मात्र, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पंड्या पूर्णपणे ठीक आहे. तसेच, तो दररोज सराव करत आहे. सूत्राने टीओआयला सांगितले की, ‘हार्दिक घोट्याच्या दुखापतीतून बाहेर आला आहे आणि दररोज सराव करत आहे.’
India Vs Afghanistan T20i series updates (TOI):
– Hardik Pandya recovered from his ankle injury and might be leading the team.
– Suryakumar Yadav ruled out of the series.
– Rohit Sharma might be asked to lead team if Hardik is unavailable and Jadeja not made stand in captain. pic.twitter.com/KekHOrY4Yn
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 24, 2023
‘आयपीएलमध्ये खेळणार नाही, ही अफवा’
सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “हार्दिक पूर्णपणे फिट आणि निरोगी आहे. एवढेच नाही, तर तो वर्कआऊटही करत आहे. ज्या गोष्टी सुरू आहेत की, तो आयपीएल खेळणार नाही, त्या केवळ अफवा आहेत. आयपीएल 2024 हंगामासाठी जवळपास 4 महिने बाकी आहेत. त्यामुळे सध्या तरी या फक्त अफवा आहेत.”
पंड्या मुंबईचा कर्णधार
खरं तर, आयपीएल 2024 लिलावापूर्वी हार्दिक पंड्या सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरला होता. त्याला मुंबई इंडियन्स संघाने ट्रेड विंडोमध्ये गुजरात टायटन्स संघाकडून आपल्याकडे घेतले होते. तसेच, आगामी हंगामासाठी त्याला कर्णधारपदाची जबाबदारीही दिली. आता मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 हंगामात उतरेल. (all rounder hardik pandya is ready to return from injury in india vs afghanistan t20 series after suryakumar yadav injury)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीपूर्वी टीम इंडियात परतला Virat Kohli, ‘या’ कारणामुळे घेतलेली सुटी; झाला खुलासा
Captain vs Captian: एलिसा हिलीने अडवला चेंडू; हरमनप्रीतला राग अनावर, पण पंचांचा निर्णय मात्र…