क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खेळाडू चेंडू लागून गंभीर जखमी होताना दिसले आहेत. अनेकदा ही दुखापत इतकी गंभीर असते की खेळाडूंना तातडीने दवाखान्यात हलवावे लागते. असाच काहीसा प्रकार पाकिस्तान सुपर लीग २०२१ स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाला. या स्पर्धेत फलंदाजी करत असताना आंद्रे रसलला मोठी दुखापत झाली.
शुक्रवारी (११ जून) पीएसएलमधील क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड संघात सामना झाला. या सामन्यात क्वेटाकडून खेळणारा आंद्रे रसल इस्लामाबादच्या मुसा खान विरुद्ध फलंदाजी करताना हेल्मेटवर चेंडू आदळल्याने जखमी झाला. ही घटना क्वेटाचा संघ फलंदाजी करत असताना १४ व्या षटकात घडली.
झाले असे की या सामन्यात क्वेटा प्रथम फलंदाजी करत होते. त्यावेळी १४ व्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर आंद्र रसलने मुसा खानला खणखणीत षटकार ठोकले. पण त्यानंतर मुसा खानने बाऊंसर टाकला. त्यावर आंद्र रसलने हुकचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा फटका चुकला आणि चेंडू त्याच्या हेल्मेटवर जोरदार आदळला.
चेंडू आदळल्यानंतर रसल खाली कोसळला. त्यानंतर फिजिओने लगेचच येऊन त्याला तपासले. रसलने फिजिओशी चर्चा केल्यानंतर पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो त्याच्या पुढच्याच चेंडूवर बाद झाला. क्वेटाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १३३ धावाच केल्या.
One must always witness a Dre Russ show. This time cut short by @iMusaKhan 🪄 #MatchDikhao l #HBLPSL6 l #QGvIU pic.twitter.com/pemprmMbCj
— PakistanSuperLeague (@thePSLt20) June 11, 2021
स्ट्रेचरवरुन रसलला नेण्यात आले दवाखान्यात
क्वेटाची फलंदाजी संपल्यानंतर अचानक आंद्रे रसलला त्रास होत असल्याने स्ट्रेचरवरुन दवाखान्यात स्कॅनिंगसाठी घेऊन जाण्यात आले. त्यामुळे तो गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. त्याच्या ऐवजी वेगवान गोलंदाज नसीम शहाला क्वेटाने कन्कशन सब्सटिट्यूट म्हणून संधी दिली. यावर इस्लामाबादचा कर्णधार शादाब खानने प्रश्न उपस्थित केला होता की रसल अष्टपैलू क्रिकेटपटू असताना नसीम शहाला संधी कशी देण्यात आली. पण हा वाद नंतर थांबला.
Andre Russell being taken on a stretcher as a follow-up to the concussion tests.
Our thoughts with the big man.
LIVE #IUvQG COMMS:
👉https://t.co/HEIexBQ9kJ👈 #HBLPSL6 | #PSL2021 | #PSL | #MatchDikhao | @Russell12A
Video courtesy: @ChangeofPace414 pic.twitter.com/87tnGP71gk— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) June 11, 2021
अखेर हा सामना इस्लामाबादने १० विकेट्सने केवळ १० षटकात १३४ धावांचे आव्हान यशस्वी पार करत जिंकला. इस्लामाबादकडून कॉलीन मुनरोने ३६ चेंडूत ९० धावांची तुफानी खेळी केली. तर २७ चेंडूत ४१ धावा उस्मान ख्वाजाने केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
अरे बापरे! श्रीलंका दौऱ्याआधी भारतीय संघ राहणार तब्बल इतके दिवस क्वारंटाईन
Video: विजेच्या वेगाने आलेला चेंडू ‘या’ इंग्लिश क्षेत्ररक्षकाने टिपत संपवली कॉनवेची अप्रतिम खेळी
खुद्द शार्दुलचे प्रशिक्षक म्हणाले, ‘कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यात त्याला तेव्हाच खेळवा, जेव्हा…’