भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी साताऱ्याची 17 वर्षीय आदिती स्वामी ही जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा विजेती ठरली आहे.
तसेच या स्पर्धेत भारताकडून वैयक्तिक सुवर्ण जिंकणारी पहिली खेळाडू बनली आहे. बर्लिन येथे झालेल्या या स्पर्धेत तिने वैयक्तिक तसेच सांघिक अशी दोन सुवर्णपदके जिंकली.
अंतिम सामन्यात अदितीने दाखवलेले कौशल्य, अचूकता, स्थिरता कमालीची होती. अंतिम लढतीत तिने मेक्सिकन बेसेराला 149-147 ने हरवले. भारताच्याच ज्योती वेन्नमने कांस्य जिंकले.
त्याचबरोबर ज्योती वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत यांनी भारताला सांघिक प्रकारातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पहिलेवहिले सुवर्ण मिळवून दिले. कंपाऊंड आर्चरी अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने मेक्सिकोला 235-229 असे नमवले.
(Archer Aditi Swami And Womens Compound Team Won Gold In Berlin Archery Championship)
महत्वाच्या बातम्या:
रिटायर झाल्यानंतर ब्रॉडने सांगितले सध्याच्या सर्वोत्तम गोलंदाजाचे नाव, म्हणाला, “त्याचा रनअपच भारी”
‘मी पुढील 2 महिन्यात…’, काऊंटी क्रिकेटमधून घेतलेल्या ब्रेकविषयी रहाणेचा मोठा खुलासा