पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी नुकताच वडील बनला आहे. त्याची पत्नी अंशा आफ्रिदी हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शाहीन बाप बनल्यानंतर क्रिकेटपटू सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, पॅरिसमध्ये नुकताच ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक पटकावणारा भालाफेकपटू अर्शद नदीम याने शाहीन आणि आजोबा शाहिद आफ्रिदीचे विशेष अभिनंदन केले आहे.
भालाफेकपटू अर्शद नदीमने सोशल मीडिया साइट ‘एक्स’वर पोस्ट केली आणि लिहिले, ‘शाहीन शाह आफ्रिदी तुझ्या लाडक्या मुलाच्या जन्माबद्दल अभिनंदन! आणि दादा बनल्याबद्दल शाहिद आफ्रिदीचे हार्दिक अभिनंदन. अल्लाह तुमच्या लहान मुलाला आरोग्यदायी ठेवो. त्याला सर्व सुख मिळो. या नवीन अध्यायासाठी तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा आणि प्रार्थना.’
Congratulations to Shaheen Shah Afridi @iShaheenAfridi on the birth of your precious baby boy! And heartfelt congratulations to Shahid Afridi @SAfridiOfficial on becoming a grandfather. May Allah bless the little one with health, happiness. Prayers and best wishes to your family…
— Arshad Nadeem (@ArshadOlympian1) August 24, 2024
लग्नाच्या वर्षभरानंतर बनला बाबा
दरम्यान लग्नाच्या 1 वर्षानंतर शाहीन आणि अंशा आफ्रिदी या जोडप्यानं त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं. या जोडप्यानं आपल्या मुलाचे नाव ‘अली यार’ ठेवलं आहे. शाहीननं 3 फेब्रुवारी 2023 रोजी माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशाशी लग्न केलं होतं. तेव्हा त्याच्या लग्नाची पाकिस्तानसह क्रीडा विश्वात खूप चर्चा झाली होती. या दोघांचा साखरपुडा लग्नाच्या दोन वर्षांपूर्वीच झाला होता. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लग्न होऊ शकलं नव्हतं.
2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहीनने तिन्ही फॉरमॅटमध्ये फार कमी वेळात आपले स्थान निर्माण केले. तो पाकिस्तान संघाचा स्टार वेगवान गोलंदाज आहे. बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तो पाकिस्तान क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीचे नेतृत्व करत आहे. त्याने कसोटी आणि वनडे सामन्यांमध्ये शंभरहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये विकेटच्या शतकापासून तो फक्त 4 विकेट्स दूर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशच्या फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर ‘बापमाणूस’ बनलेल्या आफ्रिदीचे खास सेलिब्रेशन – Video
“रिकाम्या हातानं आलो, रिकाम्या हातानं जाणार”, निवृत्तीनंतर शिखर धवनची पहिली प्रतिक्रिया
“मी शाळेतही कधी सस्पेंड झालो नव्हतो”, ‘कॉफी विथ करण’मधील वादावर राहुलचं मोठं वक्तव्य