इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-२० सामना गुरुवारी (७ जुलै) खेळला गेला. रोहिता शर्माने या सामन्यातून भारतीय संघात पुनरागमन केले. भारताचा १८ सदस्यीय संघ या मालिकेसाठी उपस्थित आहे, त्यातील निवडक ११ खेलाडूंना पहिल्या सामन्यात संधी दिली गेली. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मागच्या बऱ्याच दिवसांपासून आंतरारष्ट्रीय पदार्पणाच्या प्रतिक्षेत होता. संघ व्यावस्थापनाने अखेर त्याला संघात संधी दिली आहे.
https://www.instagram.com/p/Cft7DCwNNDc/
आयपीएल २०२२ मध्ये अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) पंजाब किंग्जसाठी महत्वाचा गोलंदाज ठरला. आयपीएलमधील प्रदर्शन पाहिल्यानंतर अर्शदीपला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात निवडले गेले, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळाली नाही. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतही तो आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकला नव्हता. परंतु इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-२० (ENG vs IND T29 Series) सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली आहे.
Congratulations to @arshdeepsinghh who is all set to make his T20I debut for #TeamIndia
He receives his cap from Captain @ImRo45#ENGvIND pic.twitter.com/2YOY15GwRj
— BCCI (@BCCI) July 7, 2022
अर्शदीपने आयपीएल २०२२ मध्ये खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये १० विकेट्स घेतल्या. इतरांच्या तुलनेत या विकेट्स जरी कमी असल्या, तरी शेवटच्या षटकांमध्ये तो पंजाब किंग्जसाठी खूपच किफायतशीर ठरला होता. याच पार्श्वभूमीवर त्याला भारतीय संघात निवडण्याचा निर्णय निवडकर्त्यांनी घेतला आणि गुरुवारी त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले देखील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रोहितच्या पुनरागमनानंतर भारताचे नशिब फळफळले! नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
‘गांगुलीनेच मला उपकर्णधार बनवण्यासाठी शिफारस केली होती’, सचिनने उलघडले गुपित
उद्योजक आनंद महिंद्रांकडून धोनीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले…