ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या ऍशेस मालिका खेळली जात आहे. ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला धूळ चारली होती. मालिकेतील दुसरा सामना गुरुवार (१६ डिसेंबर) पासून खेळला जात आहे आणि या सामन्यात देखील ऑस्ट्रेलिया संघ भक्कम स्थितीत आहे. ऑस्ट्रेलिया संघ या दुसऱ्या सामन्यात देखील विजयाच्या दिशेने पुढे चालला असल्याचे दिसत आहे. अशातच मैदानाबाहेर देखील एक मनोरंजक घटना घडली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावार व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने सामन्याच्या पहिल्या डावात ४७३ धावा केल्या होत्या तर, दुसरीकडे इंग्लंड संघ पहिल्या डावात २३६ धावा करून सर्वबाद झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २३० धावा केल्या आणि सध्या इंग्लंड संघावर मोठी आघाडी बनवली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर दुसऱ्या डावात स्वस्तात बाद झाला. त्याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी १३ धावा केल्या आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर धावबाद झाला. त्यानंतर जेव्हा वॉर्नर ड्रेसिंग रूममध्ये गेला, तेव्हा ही घटना घडली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तिसऱ्या दिवशी जेव्हा वॉर्नर ड्रेसिंग रूममध्ये गेला, तेव्हा त्याला एक जोरदार शिंक आली. ही शिंक एवढी जोरात होती की, वॉर्नर ज्या खुर्चीवर बसला होता ती खुर्ची देखील कोलमडली होती आणि तो खाली पडू शकत होता. सुदैवाने तो खाली पडला नाही, पण सोशल मीडियावार हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वॉर्नरने ज्यावेळी ही शिंक दिली, त्यावेळी त्याच्या शेजारी स्टीव स्मिथ आणि जस्टिन लेंगर होते आणि ते देखील वॉर्नरचा तोल जाताना पाहून हौराण झाले होते. चाहते या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Rib soreness + sneezing = scenes.
Poor David Warner 🙈😅 #Ashes pic.twitter.com/nfjE6g38hv
— 7Cricket (@7Cricket) December 19, 2021
वॉर्नच्या या ऍशेस मालिकेतील प्रदर्शनाचा विचार केला, तर ते अप्रतिम राहिले आहे. या मालिकेत त्याचे आतापर्यंत दोन वेळा शतक होता-होता राहिले आहे. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ९४ धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ९५ धावा केल्या आहेत.
पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानं ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाच्या विजयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघ ऍशेस मालिकेत २-० अशी आघाडी घेऊ शकतो आणि परिणामी इंग्लंडसाठी मालिका जिंकणे कठीण होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या –
“भारत २-१ ने दक्षिण आफ्रिकेला लोळवेल”; माजी खेळाडूने दाखवला टीम इंडियावर आत्मविश्वास
नयन मोंगिया: यष्टीरक्षक म्हणून ‘तो’ अव्वल होता, मात्र संथ खेळ्यांनी संपवली कारकीर्द