---Advertisement---

आशिया इलेव्हन संघात विराट कोहली, केएल राहुलसह ६ भारतीयांचा समावेश; असे आहेत संघ

On: मंगळवार, फेब्रुवारी 25, 2020 4:26 PM
---Advertisement---

पुढील महिन्यात बांगलादेशमध्ये आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश (Asia XI vs World XI) या संघामध्ये दोन आंतरराष्ट्रीय टी20 सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 15 जणांच्या आशियाई संघाची घोषणा केली आहे.

या संघात भारताचा कर्णधार विराट कोहलीसह 6 भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या संघात सर्वाधिक भारतीय खेळाडू आहेत. यात कोहलीसह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शिखर धवन, रिषभ पंत आणि केएल राहुल या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच भारतीय खेळाडूंपैकी राहुल फक्त एका सामन्यासाठी उपलब्ध असेल, तर कोहलीच्या या सामन्यांसाठीच्या उपलब्धतेबद्दल नंतर निर्णय घेतला जाईल.

त्याचबरोबर या आशियाई संघात तमीम इक्बाल, लिटन दास, मुश्फिकुर रहीम आणि मुस्तफिजुर रहमान या बांगलादेशच्या खेळाडूंचा समावेश आहे.

तसेच श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या प्रत्येकी 2 खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे. श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा आणि थिसेरा परेरा; अफगाणिस्तानचे मुजीब-उर रेहमान आणि राशिद खान या संघात आहेत. तर नेपाळच्या संदीप लामिछानेलाही या संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र असे असले तरी पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचा आशियाई संघात समावेश नाही.

याबरोबरच इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार विश्व एकादश संघात फाफ डू प्लेसिस, ख्रिस गेस, जॉनी बेअरस्टो अशा खेळाडूंचा समावेश आहे.

आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघात होणाऱ्या टी20 सामन्यांचे आयोजन बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त केले जात आहे. आयसीसीने त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा दिला आहे. या 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 18 मार्च आणि दुसरा सामना 21 मार्चला शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम (Sher-e-Bangla National), ढाका (Dhaka) येथे पार पडणार आहे.

असे असतील संघ – 

आशियाई एकादश – केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रिषभ पंत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, थिसेरा परेरा, लसिथ मलिंगा, राशिद खान, मुजीब उर रहमान, मुस्तफिजुर रहमान, तमीम इक्बाल, मुश्फिकुर रहीम, लिटन दास, संदीप लामिछाने

विश्व एकादश – अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस गेल, फाफ डू प्लेसिस, निकोलस पूरन, ब्रेंडन टेलर, जॉनी बेअरस्टो, किरॉन पोलार्ड, आदिल रशीद, शेल्डन कोट्रेल, लुंगी एन्गिडी, अँड्र्यू टाय, मिशेल मॅकक्लेनाघन

असे असेल बांगलादेशमधील आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघातील टी20 सामन्यांचे वेळापत्रक-

18 मार्च – पहिला टी20 सामना – सायं 6 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) –  शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका

21 मार्च – दुसरा टी20 सामना –  सायं 6 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) – शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका

https://twitter.com/Maha_Sports/status/1232218892963110913

https://twitter.com/Maha_Sports/status/1232205971621060609

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---