कबड्डीमध्ये डार्कहॉर्स म्हणून गणल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियाच्या संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगऴी छाप पाडली आहे.
प्रो-कबड्डीमध्ये बंगाल वॉरीयर्सकडून खेळणाऱ्या जॅंग कून लीपासून प्रेरणा घेत डाँग जिऑन ली, डाँग ज्यू किम आणि यांग चँग को यांसारखे खेऴाडूदेखील आपापल्या प्रो-कबड्डी संघाकडून खेऴताना चमकत आहेत.
2018 आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी दक्षिण कोरियाच्या पुरूष आणि महिला संघांची निवड पार पडली. परंतु पुरूष संघातील डावा कोपरारक्षक जेइ मिन ली याने दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतली आहे.
त्याच्याजागी अष्टपैलू याँग जू उक याची निवड करण्यात आली आहे. याँग उक जवळपास दोन वर्षांनी संघात पुनरागमन करत आहे.
दक्षिण कोरिया पुरूष संघाने 2010 मध्ये पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा खेऴली. परंतु अनुभव ऩसल्याने त्यांना इराण (55-20) आणि भारताकडून (37-19) पराभव स्वीकारावा लागला आणि ते पाचव्या स्थानावर राहिले.
मात्र 2014 आशियाई क्रीडा स्पर्धेत जबरदस्त पुनरागमन करताना कांस्यपदक पटकावले. त्यांनी साखऴी सामन्यांत जपान (17-14) आणि मलेशिया (38-22) यांना हरवले आणि इराणकडून (22-41) मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
त्यानंतर उपांत्य सामन्यात भारताने (36-25) त्यांचा पराभव केला. मात्र त्यांच्या मॅटवरील चपऴतेचे कबड्डीविश्वात कौतुक झाले.
तसेच महिला संघ मात्र 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एकही सामना जिंकण्यात अयशस्वी ठरला. भारत (21-47) आणि बांग्लादेश (19-28) संघांकडून पराभव झाल्याने त्यांना साखऴी स्पर्धेतूनच बाहेर पडावे लागले.
2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही पुन्हा बांग्लादेश (18-30) आणि भारत (26-45) संघांकडून पराभव झाल्याने त्यांना गटात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
यावर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मात्र स्थान उंचावण्यावर त्यांचा भर असेल.
दक्षिण कोरिया पुरूष संघाने आतापर्यंत पार पडलेल्या तीनही विश्वचषक स्पर्धेत (2004, 2007, 2016) सहभाग घेतला आहे. त्यांपैकी 2004 आणि 2007 च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांना साखऴी स्पर्धेतूनच बाहेर पडावे लागले.
मात्र 2016 विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त पुनरागमन करताना साखऴी सामन्यात भारताचा (34-32) पराभव करत अ गटात प्रथम स्थान पटकावले.
गेल्या काही वर्षांत भारताला पराभूत करणारा दक्षिण कोरिया हा एकमेव संघ आहे. यावरून दिसून येते की दक्षिण कोरिया संघाने कबड्डी हा खेऴ किती अंगीकारला आहे.
2018 आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी दक्षिण कोरिया पुरूष आणि महिला संघ पुढीलप्रमाणे –
पुरूष संघ
जॅंग कून ली (कर्णधार), डाँग जिऑन ली, ताइ द्योक इयोम, याँग जू उक, डाँग ज्यू हाँग, डाँग ज्यू किम, जाइ पिल जो, सियाँग रियोल किम, ह्यून पार्क, ग्यूँग ताइ किम, याँग चँग को
महिला संघ
दाह्ये चोइ, हाइ मिन हाँग, जी याँग किम, जाइ वॉन इम, ही जियाँग किम, ह्यून जियाँग ली, मिंक यूंग पाक, जी यी पार्क, सो मिन शिन, ह्यू ना जो, ही जून वो, यू री यून
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अर्जुन तेंडुलकरची लॉर्ड्सच्या मैदानावर क्षणभर विश्रांती
–तिसऱ्या कसोटीत आर अश्विन टीम इंडियाचा कर्णधार?
–पाकिस्तानी कर्णधार म्हणतो, टीम इंडियाला आशिया चषकात आम्हीच वरचढ