ऑस्ट्रेलियाने २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये भारताकडून घरच्या मैदानावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली. भारताने ऑस्ट्रेलियात सलग दोन कसोटी मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. हा पराभव कांगारू संघ आजवर विसरू शकलेला नाही. अशा स्थितीत त्याचा बदला घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. वास्तविक, ऑस्ट्रेलियाला ४ कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी २०२३च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतात यायचे आहे. कांगारू संघाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत ऑस्ट्रेलियन फलंदाज विल पुकोव्स्की आणि इतर सात खेळाडू पुढील महिन्यात चेन्नईला एमआरएफ पेस फाउंडेशन येथे १० दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी जाणार आहेत.
२४ वर्षीय पुकोव्स्कीने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते, परंतु सामन्यादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. यानंतर गेल्या ऑक्टोबरमध्येही तो डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. मार्श शेफिल्ड शील्ड फायनलमध्ये ५९ धावा करून तो परतला.
पुकोव्स्की भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकतो
त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात स्थान देण्यात आले नव्हते, परंतु पुकोव्स्कीचा शिबिरात समावेश केल्यामुळे भारताच्या कसोटी दौऱ्यासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो. जोश फिलिप, टीग वायली, कूपर कोनोली, हेन्री हंट आणि फिरकीपटू मॅट कुह्नेमन, टॉड मर्फी आणि तन्वीर संघा हे इतर खेळाडू आहेत जे ७ ते १७ ऑगस्ट दरम्यान प्रशिक्षण शिबिरासाठी भारतात जाणार आहेत. श्रीलंकेचा माजी फलंदाज थिलन समरवीरा प्रशिक्षक गटाचा एक भाग आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघ २०२३च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला भारताकडून ४ कसोटी, तीन एकदिवसीय आणि तब्बल टी-२० मालिका खेळायच्या आहेत. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीचा भाग आहे आणि WTC अंतिम फेरीसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पहिल्या वनडेत सुसाट असलेल्या धवनच्या गाडीला दुसऱ्या सामन्यात लागला ब्रेक, रंगली एकच चर्चा
“माझं करीयर वाचवा”; ऑलिम्पिक विजेत्या लवलिना बोर्गोहेनने फोडली स्वतःवरील अन्यायाला वाचा
कॅप्टनसीचा फायदा घेत धवन ‘या’ सलामीवीराची कारकीर्द लावतोय पणाला? वाचा सविस्तर