इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज बुधवार दि.27 जूनला एकमेव टी-20 सामना बर्मिंगहम येथे होत आहे.
एकदिवसीय मालिकेतिल लाजिरवाण्या पराभवानंतर अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ आज इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरेल.
एकदिवसीय मालिकेत इंग्लंडने तब्बल 140 वर्षानंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाला 5-0 असा व्हाइट वॉश दिला आहे.
आयसीसी टी-20 क्रमावारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने गेल्या आठ सामन्यांपैकी सात सामन्यात विजय प्राप्त केले आहेत.
तर दुसरीकडे तुफान फॉर्मात असललेल्या इंग्लंड संघाला रोखने ऑस्ट्रेलियासाठी सोपे नाही.
इंग्लंडची फलंदाजी ऐन भरात असताना ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी इंग्लिश फलंदाजांना लगाम घालण्याशिवाय पर्याय नाही.
या एकमेव टी-20 सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार अॅरॉन फिंचने पत्रकार परीषदेत या सामन्याबद्धल चर्चा केली.
“एकदिवसीय मालिकेत आमची कामगिरी खराब झाली आहे. मात्र त्याच्याविषयी आता विचार करण्याची गरज नाही. या सामन्यातून आम्ही नवी सुरवात करण्याच्या प्रयत्न करणार आहोत.” असे फिंच म्हणाला.
तसेच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील पराभवामुळे नवख्या टीम पेनच्या कर्णधार पदाबाबत उलट सुलट चर्चा होत आहे.
“मी सध्या तरी याबद्दल काही विचार केला नाही. परंतू जर मला संधी मिळाली तर तो माझा सन्मान असेल.” एकदिवसीय कर्णधार पदाबाबत बोलताना फिंच म्हणाला.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव टी-20 सामना आज बुधवार दि. 27 जून रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-Video: हार्दिक पंड्याने घेतली आजी-माजी कर्णधारांची हटके…
-जगात अनेक क्रिकेटर झाले परंतु असा पराक्रम करणारा धोनी एकटाच!