भारतीय संघाला चेन्नई येथे इंग्लंड विरुद्ध झालेली पहिली कसोटी २२७ धावांनी गमवावी लागली. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पराभूत होण्याची अनेक कारणे होती आणि त्यापैकी एक म्हणजे अंतिम अकरा खेळाडूंची निवड. भारतीय संघाने शाहबाज नदीम आणि वॉशिंग्टन सुंदरच्या रूपात अंतिम अकरामध्ये दोन अनुनभवी गोलंदाजांना संधी दिली आणि इंग्लंडच्या फलंदाजांनी विशेषतः जो रूटने याचा फायदा उठविला. भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात मुसंडी मारायची असेल तर, संघनिवडीच्या बाबतीत काही मोठे निर्णय घ्यावे लागतील.
नदीमच्या निवडीची रंगली चर्चा
शाहबाज नदीमला खराब कामगिरीनंतर पुढच्या सामन्यात संधी मिळणे कठीण आहे. पहिल्या कसोटीत शाहबाज नदीमने ४ बळी मिळवले. परंतु, त्यासाठी खोर्याने धावा दिल्या. अशा परिस्थितीत त्याला आता दुसऱ्या सामन्यासाठीच्या अंतिम अकरामध्ये संधी मिळणे जवळपास अशक्य झाले आहे. चाहत्यांना आशा आहे की, पुढील कसोटी सामन्यात भारतीय संघात कुलदीप यादवला संधी मिळेल. त्यामुळे, दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची संघनिवड पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दुसरीकडे गोलंदाज म्हणून सामील केला गेलेला अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीत साफ अपयशी ठरला. मात्र, फलंदाजी करताना पहिल्या डावात त्याने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहलीने त्याला गोलंदाजी करण्याची संधी दिली नव्हती. तर, पहिल्या डावात २६ षटके गोलंदाजी टाकताना त्याला एकही बळी मिळाला नव्हता.
असे होऊ शकतात बदल
भारतीय संघ व्यवस्थापनाने दुस-या कसोटीसाठी बदल करण्याचे निश्चित केल्यास काही बड्या खेळाडूंना संधी मिळू शकते. शाहबाज नदीमच्या ऐवजी कुलदीप यादवला संधी देण्यात यावी, अशी मागणी अनेक माजी क्रिकेटपटू व जाणकारांनी केली आहे. कुलदीप बऱ्याच काळापासून संघाचा भाग असताना ही अंतिम अकरामध्ये स्थान मिळवू शकला नाही. त्यामुळे हा बदल हे जवळपास निश्चित वाटतो.
अष्टपैलू म्हणून संधी दिल्या गेलेल्या वॉशिंग्टन सुंदर ऐवजी वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या किंवा डावखुरा फिरकी गोलंदाजी अष्टपैलू अक्षर पटेल यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीसाठी अक्षर संघाचा भाग होता मात्र, अचानक दुखापतीमुळे त्याला सामन्यापूर्वी बाहेर व्हावे लागले. अशा परिस्थितीत, चांगली कामगिरी केल्यानंतरही वॉशिंग्टन सुंदरला बाकावर बसवले जाऊ शकते. अक्षर पटेलला अंतिम अकरा खेळाडूंत स्थान मिळाले तर, तो त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असेल.
असा असू शकतो दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ-
शुबमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधारपद), रिषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, कुलदीप यादव
महत्वाच्या बातम्या:
श्रेयस अय्यर आणि चहलची पत्नी धनश्री वर्माचा भन्नाट डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल
हा आयपीएल संघ बदलणार नाव आणि लोगो? लवकरच होणार घोषणा
तुम्ही आमचा कोहिनूर द्या आणि, भारतीय चाहत्याचे मायकेल वॉनला सडेतोड उत्तर