भारतीय संघाला 22 जानेवारीपासून घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. ज्यासाठी बीसीसीआयने काल (11 जानेवारी) संध्याकाळी संघाची घोषणा केली. या संघात काही मोठे बदल दिसून आले असले तरी, उपकर्णधारपदाची जबाबदारी फिरकी अष्टपैलू अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली आहे. टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळायचा आहे. या संपूर्ण मालिकेत सूर्यकुमार यादव कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल, तर हार्दिक पांड्यालाही संघात स्थान मिळाले आहे. परंतु निवडकर्त्यांनी अक्षर पटेलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करून मोठा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही वर्षांत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अक्षर पटेलची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. ज्यामध्ये त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. 2024 मध्ये, अक्षरने टीम इंडियाला 2024 चा टी20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मागील वर्षात अक्षर पटेलने एकूण 16 टी20 सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 16.30 च्या उत्कृष्ट सरासरीने 20 विकेट्स घेतल्या, त्यामुळे त्याची कामगिरी पाहून निवडकर्त्यांनी आता त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे पुनरागमन झाले आहे, तर विजय कुमार वैशाख, आवेश खान आणि यश दयाल यांना संघातून वगळण्यात आले आहे. जे खेळाडू होते मागील टी२० मालिकेतील संघातील काही खेळाडूंना मार्ग दाखवण्यात आला आहे. याशिवाय, हर्षित राणा देखील टी20 मालिकेसाठी संघाचा भाग आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी , वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर
हेही वाचा-
14 महिन्यांनतर मोहम्मद शमीचे पुनरागमन! नाही खेळणार सर्व सामने? मोठे अपडेट समोर
दिनेश कार्तिकने रचला इतिहास, SA20 लीग खेळणारा ठरला पहिलाच भारतीय
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी रविंद्र जडेजाचे स्थान धोक्यात, माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा