आशिया चषक 2022 मधील पाकिस्तानविरुद्धचा बहुप्रतिक्षित सामना भारताने 5 विकेट्स राखून जिंकला. या सामना विजयात अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याबरोबरच वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचाही मोठा वाटा राहिला. भुवनेश्वरने या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या 4 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. यात पाकिस्तानचा विद्यमान कर्णधार बाबर आझम याच्या विकेटचाही समावेश होता. सामन्यानंतर भुवनेश्वरने आझमविरुद्धच्या रणनितीबद्दल विस्ताराने सांगितले आहे.
भुवनेश्वरने (Bhvneshwar Kumar) या सामन्यात पाकिस्तानच्या 4 विकेट्स घेतल्या. 4 षटके फेकताना 26 धावा देत त्याने 4 फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. या 32 वर्षीय वेगवान गोलंदाजाने पाकिस्तानी कर्णधाराला (Babar Azam) आपल्या दुसऱ्याच षटकात बाउंसर वर बाउंसर टाकत हैरान केले. यातील चौथ्या चेंडूवर (2.4 षटक) चेंडूला फुल करण्याच्या प्रयत्नात फाइन लेगवर अर्शदीप सिंगच्या हाती झेल देत आझम बाद झाला. आझम वैयक्तिक 10 धावांवर बाद झाला.
सामन्यानंतर आपली गोलंदाजीची रणनिती (bhuvneshwar Kumar Plan) सांगताना भुवनेश्वर म्हणाला की, “कोणत्याही खेळाडूसाठी महत्त्वपूर्ण असते की, त्याच्याकडे आधीपासूनच एक योजना तयार असावी. मग तो गोलंदाज असो वा फलंदाज. प्रत्येकाने योजनेसह मैदानावर उतरले पाहिजे. कारण टी20 हे खूप वेगाने बदलणारे क्रिकेटचे स्वरूप आहे.”
“दुबईच्या खेळपट्टीवर स्विंग फेकल्यावर मदत मिळत नव्हती. खेळपट्टीवर चेंडू जास्त उसळी घेत होता. त्याअनुषंगाने आम्ही योजना आखली होती. आम्हाला माहिती होते की, फलंदाजाची ताकद काय आहे?. जेव्हा आपण आणखी जास्त चेंडू फेकतो, तेव्हा नव्या गोष्टी समजतात.”
आझमला बाद केले याचा अर्थ अर्धा संघ बाद झाला
पुढे बोलताना भुवनेश्वरने अप्रत्यक्षपणे आझमचे कौतुक केले. तो म्हणाला की, “आझम बाद झाल्यानंतर आम्ही असा विचार केला होती की, आता पाकिस्तानचा अर्धा संघ बाद झाला आहे. तो एक चांगला खेळाडू आहे. त्यामुळे असे वाटणे साहजिक आहे. परंतु तांत्रिक पद्धतीने आणखी इतर 9 फलंदाज बाद व्हायचे बाकी होते.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
देशप्रेमापोटी मेजर ध्यानचंद यांनी नाकारली होती चक्क हिटलरची ऑफर; वाचा त्यांच्याबद्दलच्या रोमांचक गोष्टी
…तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता! ब्रॅडमन अन् ध्यानचंद यांच्या भेटीचा रोमांचक किस्सा
बदला पूर्ण! हार्दिक-जड्डूच्या तडाख्यात पाकिस्तान उडाली; आशिया कपमध्ये टीम इंडियाचा विजयी श्रीगणेशा