पाकिस्तानचे माजी दिग्गज क्रिकेटपटू रमीज राजा यांनी सध्याचा पाकिस्तान कर्णधार बाबर आझम याचे कौतुक केले आहे. राजांंनी बाबरचे काहीसे जास्तच कौतुक केल्याचे चाहत्यांकडून बोलले जात आहे. रमीज राजा यांनी बाबर आझमची तुलना क्रिकेट इतिहासातील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली आहे. शुक्रवारी (5 मे) न्यूझीलंडविरुद्ध बाबारने शतक केल्यानंतर राजा बोलत होते.
रमीज राजा (Rameez Raja) यांच्या मते मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बाबर आझम (Babar Azam) याने दाखवलेले सातत्य कौतुकास्पद आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष राजा एका मुलाखतीत म्हणाले की, “बाबर आझम डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्यापेक्षा कमी नाहीये. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याचे आकडे पाहिले, तर तो जगातील सर्वक्षेष्ट खेळाडू बनला आहे. मी या फॉरमॅटमध्ये कोणत्याच खेळाडूत बाबरएवढे सातत्य पाहिले नाहीये. त्याला मिळालेले यश त्याची खेळण्याची पद्धत आणि स्वभावामुळे आहे. त्याला खेळताना तधीच अडचण येत नाही. मग खेळपट्टी ग्रीनटॉप असो किंवा कराचीसारखी. कराचीत शक्यतो गोलंदाज संघर्ष करताना दिसतात.”
बाबरने वनडे क्रिकेटमध्ये नुकत्याच आपल्या 5000 धावा पूर्ण केल्या. याविषयी राजा म्हणाले की, “तो सर्वात जलद 5000 वनडे धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने विव रिचर्ड्ससारख्या अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे. ही एक मोठी कामगिरी आहे. पाकिस्तान वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यासाठीही हे एक महत्वाचे कारण राहिले आहे.” दरम्यान बाबर मागच्या काही महिन्यात चमकदार कामगिरी करताना दिसला आहे. पण त्यापूर्वी आशिया चषक 2022 आणि टी-20 विश्वचषकात त्याची बॅट पूर्णपणे शांत दिसली होती. आगामी आशिया चषक आणि वनडे विश्वचषकत संघाला त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. (‘Babar Azam is no less than Don Bradman’, Ramiz Raja said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023च्या 50व्या सामन्यापूर्वीच दिल्लीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! ‘हा’ हुकमी एक्का परतला मायदेशी
गंभीरसोबत झालेल्या वादानंतर विराटने थेट बीसीसीआयला लिहिले पत्र, म्हणाला, “माझ्यावर केलेली कारवाई…”