New Zealand vs Pakistan T20 : पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलॅंड यांच्यात नूकतीच 5 सामन्यांची टी-20 मालिका सूरू झाली आहे. ऑकलंड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात किवीज् संघाकडून पाकिस्तानचा दारून पराभव झाला. पाकिस्तानचा 46 धावांनी पराभव झाला असला, तरी त्यांचा स्टार फलंदाज बाबर आझम चांगल्याच फॉर्ममध्ये दिसला. त्याने 57 धावांची खेळी करताना एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
बाबरने केला पराक्रम
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने या टी-20 सामन्यात 57 धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्यात न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू मार्टिन गप्टील याला मागे टाकले आहे. आता तो विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या मागे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. मार्टिन गप्टीलने 122 सामन्यात 31.8 ची सरासरी आणि 135.7 चा स्ट्राइक रेटने 3531 धावा केल्या होत्या. बाबरने मात्र केवळ 105 सामन्यांमध्ये 3542 धावा करत गप्टीलला मागे टाकले आहे. यावेळी त्याची सरासरी 41.67 होती तर स्ट्राइक रेट 128.84 होता.
रोहित आणि विराट अजूनही ‘टॉप’ वरच
या दोन अनुभवी खेळाडूंना भारतीय टी-20 संघात स्थान मिळावे की नाही, याबद्दल खूप चर्चा चालू आहेत. पण आकडेवारी पाहिल्यावर कदाचित दोघांचे महत्व समजून येते. विराट सध्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या नावे 115 सामन्यांत 52.7 अशा जबरदस्त सरासरीने 4008 धावा आहेत. तर दूसऱ्या क्रमांकावर भारताचा कर्णधार रोहित शर्मा येतो. त्याने 149 सामन्यांत 139.1 च्या स्ट्राइक रेटने 3853 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये वादात राहिलेल्या नवीनचे मोठे विधान! केएल राहुलच्या नेतृत्वात खेळण्याबाबत काय म्हणाला वाचाच
द्रविडच्या प्रतिक्रियेनंतर इशान किशनची पहिली सोशल मीडिया पोस्ट, पाहा व्हिडिओमधून काय दिले संकेत