---Advertisement---

काय अरे पंत! स्टंप्सवरील बेल्स उडून अडकले ग्लोजमध्ये अन् त्याला पत्त्याही नाही, मग काय झालं पाहा

On: शुक्रवार, मार्च 5, 2021 4:12 PM
---Advertisement---

भारतीय आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामना अहमदाबादमध्ये खेळावला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंड संघाने फलंदाजी करताना २०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघातील फलंदाजांना देखील साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी एका छोट्याशा कारणामुळे सामना काहीकाळ थांबवण्यात आला होता. त्याचे कारण ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही.

रिषभ पंत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही कारण शोधतच असतो. फलंदाजीमध्ये तर तो लांब लांब षटकार मारून मनोरंजन करतो. सोबतच यष्टीमागे असताना काही ना काही मजेशीर बोलत किंवा स्टंट करत तो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणतो. अशातच चौथ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी पंतसोबत मजेशीर घटना घडली.

सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंड संघ फलंदाजी करत असताना स्टोक्स आणि पोप मैदानावर उपस्थित होते, त्यावेळी ४३ वे षटक फेकण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरला बोलवण्यात आले होते. सुंदरने टाकलेल्या चेंडूवर स्टोक्सने मिड विकेटच्या दिशेने शॉट खेळला. तो चेंडू सरळ कर्णधार विराट कोहलीच्या हातात गेला आणि त्याने स्टंपच्या दिशेने फेकला. यावेळी पंत यष्टीजवळ उभा होता. त्यामुळे बेल्स उडाली आणि पंतच्या ग्लोज मध्ये जाऊन अडकली.

परंतु या गोष्टीचा पंतसहित इतर कुणालाही सुगावाही नव्हता की, बेल्स त्याच्या ग्लोजमध्ये अडकले आहे. शेवटी यष्टीवरील बेल्स हरवल्याने सामना काही वेळ सामना थांबवण्यात आला होता. कर्णधार विराट कोहलीने त्यांचा शोध घेण्यासाठी पंतची तपासणी केली. त्याच्या पायावरील पॅडमध्ये त्याने पाहिले.

अखेर बेल्स शोधत असताना ती पंतच्या विकेटकीपिंग ग्लोजमध्ये आढळून आली. हे पाहून खेळाडूंना हसू आवरले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ये तो शुरू होते ही खत्म हो गया! विराट शून्यावर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

स्टोक्सचा जोरदार बाउन्सर धडकला रोहितच्या हेल्मेटला अन् घडलं असं काही, पाहा फोटो

विराट आणि शून्य! कसोटीत ‘इतक्यांदा’ कोहली भोपळाही न फोडता झालाय बाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---