वनडे विश्वचषक 2023 साठी बांगलादेश संघ मंगळवारी (26 सप्टेंबर) घोषित केला गेला. या सामन्याचे नेतृत्व शाकिब अल हसन करणार आहे. तर उपकर्णधाराची जबाबदारी लिटन दास याच्याकडे सोपवली गेली आहे. अलिकडच्याच काळात आपली निवृत्ती मागे घेणारा तमिम इकबाल याला विश्वचषक संघात स्थान मिळाले नाहीये.
तमिम इकबाल याने जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्यावेळी तमिम बांगलादेशच्या वनडे संघाचा कर्णधार असल्यामुळे संघासाठी हा मोठा धक्का होता. मात्र, पुढच्या दोन दिवसांमध्येच त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतली. आशिया चषक 2023 मध्ये तमिम पुनरगामन करण्याची शक्यता होती. पण दुखापतीमुळे त्याला आशिया चषकात खेळता आले नाही. आगामी वनडे विश्वचषकात देखील तमिल खेळताना दिसणार नाहीये.
तमिमच्या अनुपस्थितीमध्ये बांगलादेशच्या फलंदाजीची जबाबदारी मुशफिकूर रहीम, नजमुल हुसे शांतो, लिटन दास आणि शाकिब अल हसन अशा खेळाडूंवर असेल. संघाच्या फिरकी गोलंदाजीसाठी शाकिब, मेहंदी हसन मिराज, नसुम अहमद आणि मेंहदी हसन यांचा समावेश केला गेला आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये सस्कीन अहमद आणि मुस्तफिजूर रहमान सांभाळतील. त्याचसोबत शोरिफूल इस्लाम, हसन महमूद आणि तंजीम हसन यांनाही 15 सदस्यीय संघात घेतले गेले आहे. (Bangladesh 15-man squad selected for ODI World Cup)
वडने विश्वचषक 2023 साठी बांगलादेश संघ –
शाकिब अल हसन (कप्तान), मुश्फिकुर रहीम, लिटन दास (उपकप्तान), नजमुल हुसैन शान्तो, मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम, हसन महमूद, नसुम अहमद, महेदी हसन, तंजीम हसन साकिब, तंजीद हसन तमीम और महमूदुल्लाह रियाद
महत्वाच्या बातम्या –
अभिमानास्पद! चार दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारताने घोडेस्वारीत जिंकलं गोल्ड मेडल
मोठी बातमी! वनडे विश्वचषकासाठी अखेर श्रीलंकन संघ घोषित, महत्वाचे खेळाडू संघातून बाहेर