मुंबई । संपूर्ण जगभरात कोरोना हाहाकार माजवला असून याचे अनेक विपरीत परिणाम लोकांवर होत असल्याचे दिसून येत आहे. या महामारीच्या सावटात एकीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली असली तरी आशियाई देशांमध्ये परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे. बांगलादेशमध्ये सलग चौथ्या महिन्यात लॉकडाउन सुरू आहे.
कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉक डाऊन असल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून बांगलादेशमध्ये क्रिकेट ठप्प असून हजारो क्रिकेटपटू, पंच आणि प्रशिक्षक यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यातील काही खेळाडूंना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.
बांगलादेशी महिला खेळाडूंना सर्वाधिक आर्थिक झळ बसत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड महिला क्रिकेटपटूंना जास्त मानधन देत नाही. मात्र त्या मिळालेल्या मानधनातून ते आपला परिवार चालू शकतात. लॉकडाऊन लागू असल्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाला देखील आर्थिक संकटाचा सामना आहे. तरीही बांगलादेश क्रिकेट बोर्डाने महिला आणि पुरुष संघातील खेळाडूंना आर्थिक मदत केली आहे. परंतू जर लॉकडाऊन वाढले तर क्रिकेटपटूंना आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मार्च मध्ये ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या तब्बल 60 खेळाडूंना तीस हजार बांगलादेशी टक्का इतकी आर्थिक मदत दिली आहे तर महिला महिला क्रिकेटपटूंना वीस हजार बांगलादेशी टक्का (बांगलादेशी चलन) दिले आहे. एप्रिल महिन्याचे मानधन मात्र त्यांना दिले गेले नाही. मे महिन्यात बोर्डाने पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना दहा हजारांची आर्थिक मदत केली आहे.
सध्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे आर्थिक सोर्स बंद झाले आहेत. याशिवाय बोर्डाने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध होणारी मालिका देखील रद्द केली आहे. नुकतेच आशिया चषक स्पर्धा देखील रद्द झाली आहे. टी 20 विश्वचषकाबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. त्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड देखील आर्थिक संकटात सापडला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
त्याचे चुकिचे वागणे पाकिस्तानला भोवले व आम्हाला भारताने दणदणीत पराभूत केले
पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूने केली तुलना; सेहवागच्या त्रिशतकापेक्षा सचिनची ‘ती’ खेळ लाखपटीने भारी
तुमच्या संघाच्या जेवढ्या धावा आहेत तेवढ्या एकट्या कोहलीने केल्यात, जपून बोला