सध्या युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात बांगलादेशला पात्रता फेरीपासून सुरुवात करावी लागली. ओमान येथे झालेल्या पात्रता फेरीत त्यांनी ओमान व पापुआ न्यू गिनी यांना हरवत सुपर १२ फेरीमध्ये प्रवेश केला. सुपर १२ फेरीच्या पहिल्याच सामन्यात मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेकडून अटीतटीच्या सामन्यात झालेल्या त्यांना पराभूत व्हावे लागले होते. याबरोबरच आता त्यांना आणखी एक धक्का बसला असून, संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद सैफुद्दीन हा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) याबाबत ट्विट करून माहिती दिली.
Bangladesh player ruled of the #T20WorldCup 2021.
More details on his replacement ???? https://t.co/GEHMKtthag
— ICC (@ICC) October 26, 2021
विश्वचषकात केलती चांगली सुरुवात
युवा वेगवान गोलंदाज असलेल्या सैफुद्दीन याने या टी२० विश्वचषकात चांगली सुरुवात केली होती. आपल्या वेगाने त्याने सर्वांना प्रभावित केलेले. त्याने पात्रता फेरीतील तीन व श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मिळून पाच बळी आपल्या नावे केले होते. मात्र, या पाठीच्या दुखण्यामुळे तो आता स्पर्धेबाहेर गेला आहे.
हा खेळाडू घेणार जागा
सैफुद्दीन स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्याच्याजागी अनुभवी वेगवान गोलंदाज रूबेल हुसेन याला संधी देण्यात आली आहे. ३१ वर्षीय हुसेन आधीपासूनच राखीव खेळाडू मध्ये समाविष्ट होता. त्याने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत २८ टी२० सामने खेळले आहेत. तो अखेरच्या वेळी २००९ मध्ये टी२० विश्वचषकात खेळताना दिसून आला होता.
हे खेळाडू झाले आहे स्पर्धेबाहेर
सैफुद्दीन पूर्वी वेस्ट इंडीजचा अष्टपैलू फॅबियन ऍलन, इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन व न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. तसेच, भारताचा हार्दिक पंड्या व इंग्लंडचा लियाम लिव्हींगस्टोन हे खेळाडू देखील दुखापतग्रस्त आहेत.