ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे सुरू आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेसोबतच बिग बॅश लीग स्पर्धेमुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेटमय झाला आहे. यादरम्यानच बिग बॅश लीग मधील एका सामन्यात मजेशीर प्रसंग घडला असून फलंदाजाने मारलेला चेंडू थेट प्रेक्षकांमधील एका व्यक्तीच्या बियर ग्लासमध्ये जाऊन पडला.
मेलबर्न स्टार्स आणि होबार्ट हरिकेन्स दरम्यान 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या सामन्यात, होबार्ट हरिकेन्स प्रथम फलंदाजी करत होते. होबार्टच्या डावातील 16 वे षटक टाकण्यासाठी मेलबर्नचा गोलंदाज मॉरिस गोलंदाजीसाठी आला होता. मॉरिसने षटकातील तिसरा चेंडू टाकला असता फलंदाज डेव्हिड मलानने चेंडू थेट सीमारेषेबाहेर पोहोचवला.
यादरम्यान चेंडू एका प्रेक्षकाच्या बियर ग्लासमध्ये जाऊन पडला. या प्रेक्षकाने प्रथम आपली बियर संपवली व त्यानंतर चेंडू मैदानात फेकला. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला असून, क्रिकेट चाहत्यांनी देखील त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
https://twitter.com/ICC/status/1345276511494893569
दरम्यान सामन्याचा विचार केला असता, होबार्ट हरिकेन्सने मेलबर्न स्टार्सचा 21 धावांनी पराभव केला. होबार्ट हरिकेन्सने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावत 164 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात मेलबर्न स्टार्सला केवळ 143 धावाच करता आल्या. स्कॉट बोलंडला आपल्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. बोलंडने 4 षटकांत केवळ 22 धावा देत 3 फलंदाजांना बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ ऑसी क्रिकेटर म्हणतो, सलामी सोबतच पेनच्या जागी विकेटकिपिंग करण्यासाठी देखील तयार
ऑस्ट्रेलियाच्या मीडियाचा दावा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्याकडूनही झाले नियमांचे उल्लंघन
सौरव गांगुलीची मुलगी सनाने दिली त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती; म्हणाली…