बीसीसीआय अध्यक्ष सौरव (bcci) गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुली यांना शुक्रवारी सायंकाळी (१३ ऑगस्ट) अस्वस्थ वाटत असल्याच्या कारणाने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. स्नेहाशीष गांगुली हे आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) सचिव आहेत. स्नेहाशीष यांना अस्वस्थता भासत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात डाॅक्टरांच्या निगरानीखाली ठेवले गेले आहे. एएनआयशी बोलताना स्नेहाशीष यांच्या जवळच्या सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.
सुत्रांनी सांगितल्याप्रमाने, “त्यांना शुक्रवारी रात्री अस्वस्थ वाटत होते. तसेच काही महिन्यांपूर्वी त्यांची ऍंजियोप्लास्टी झाली होती. ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांना दवाखान्यात भरती करून डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्याचे ठरवले गेले आहे. जवळपास रात्री १ वाजता त्यांना वुडलॅड्स दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. कारण त्यांना थोडा तापही होता. पण ते आता ठिक आहेत आणि काळजीचे काही कारण नाही.”
याचवर्षी स्नेहाशीष यांच्यावर अपोलो दवाखान्यात ऍंजियोप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली होती. १२ जानेवारी २०२१ ला स्नेहाशीष यांनी डाॅक्टरांचा सल्ला घेतला होता. त्यावेळी केलेल्या चाचण्यांमध्ये त्यांच्या ह्रदयाला रक्तस्राव करणारी वाहिनी खोलण्यची गरज होती आणि त्यासाठी ऍंजियोप्लस्टी करण्याची अवश्यकता असल्याचे निदर्शनास आले होते.
बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही जानेवारी महिन्यात याच दवाखान्यात ऍंजियोप्लास्टी केली होती. त्याला २ जानेवारीला छातीत त्रास, डोके जड होणे, उल्टी आणि चक्कर येत होती. ज्यावेळी त्याला हा त्रास सुरू झाला होता तेव्हा तो जवळपास त्याच्या घरच्या व्यायामशाळेत व्यायाम करत होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘रहाणे आणि पुजारा असे खेळाडू आहेत, ज्यांना संघाबाहेर केलं तरी ते काही बोलणार नाहीत’
मैं तो नागिन नागिन… लॉर्ड्सच्या बाल्कनीत कोहलीने धरला ठेका, सहकाऱ्यांना हसू अनावर