जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबादमधील मोटेरा येथे तयार झाले आहे. या स्टेडियमचा फोटो भारतीय नियामक क्रिकेट मंडळाने(बीसीसीआय) मंगळवारी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या स्टेडियमच्या फोटोला बीसीसीआयने कॅप्शन दिले आहे की मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद, भारत. या स्टेडियमची आसन क्षमता 1,10,00 आहे.’
#MoteraStadium
Ahmedabad, India ????????
Seating capacity of more than 1,10,000
World's largest #Cricket stadium pic.twitter.com/FKUhhS0HK5— BCCI (@BCCI) February 18, 2020
या फोटोवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. यामध्ये बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीनेही प्रतिक्रिया दिली आहे. गांगुलीने म्हटले आहे की ‘अहमदाबादमध्ये एवढे मोठे स्टेडियम पाहून छान वाटत आहे. एक खेळाडू, कर्णधार म्हणून या मैदानातील अनेक आठवणी आहेत. हजारोंची आसन क्षमता असणाऱ्या इडन ग्रार्डनला पाहून मोठा झालो. आता 24 तारखेला हे नवीन स्टेडियम पाहण्याची प्रतिक्षा आहे.’
Lovely to see such a massive ,pretty stadium .. Ahmedabad .. have great memories in this ground as a player ,captain ..grew up at Eden with hundred thousand capacity .. (not any more).. can’t wait to see this on 24th
— Sourav Ganguly (@SGanguly99) February 19, 2020
या स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेलांचे नाव दिले आहे. या स्टेडियमला मोटेरा स्टेडियम असेही म्हटले जाते. या स्टेडियमवर 1984ला पहिला वनडे सामना झाला होता. त्यानंतर जूने स्टेडियमचे नुतनीकरण करण्यात आले असून आता हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरण्यासाठी सज्ज झाले आहे.
या नव्या स्टेडियमचे उद्घाटन 24 फेब्रुवारीला होणार आहे. तसेच हे उद्घाटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. हे स्टेडियम जवळजवळ 63 एकर जागेत बनले आहे.
त्याचबरोबर या नवीन स्टेडीयममध्ये 3 प्रॅक्टीस ग्राउंड, 1 इनडोअर क्रिकेट ऍकेडमी, क्लबहाउस आणि स्विमिंग पूल तसेच 73 कॉर्पोरेट बॉक्स याचाही समावेश आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी अंदाजे 700 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.
सध्या जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम मेलबर्न स्टेडियम आहे. या स्टेडियमची आसन क्षमता 90,000 इतकी आहे.
विराट कोहलीचा पुढील ३ वर्षांतील ३ विश्वचषकांचा प्लॅन; विराटकडूनच घ्या जाणून…
वाचा- ????https://t.co/DIgx33HMNo????#म #मराठी #Cricket @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) February 19, 2020
पहिल्या कसोटी सामन्यासाठी या खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी
वाचा????https://t.co/m2fbUbwgli????#म #मराठी #Cricket #INDvsNZ #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 19, 2020