आयपीएल २०२०मध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना सुरक्षित ठेवण्यासाठी बीसीसीआय २० हजार कोरोना चाचणी करणार आहे. यासाठी बीसीसीआयने तब्बल १० कोटी रुपयांचे महागडे बजेट बनवले आहे. आयपीएलच्या सर्व ८ फ्रंचायझींनी भारतात आपापल्या संघातील खेळाडूंच्या कोरोना चाचणीचा खर्च उचलला होता. परंतु, सर्व खेळाडू युएईला पोहोचल्यानंतर त्यांची जबाबदारी बीसीसीआयच्या खांद्यावर आहे. त्यामुळे २० ऑगस्टपासून सुरु झालेल्या खेळाडूंच्या कोरोना चाचणीचा खर्च बीसीसीआय सांभाळत आहे. BCCI Will Spend 10 Crore Rupees On Corona Test During IPL
आयपीएलच्या एका सीनियर अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना म्हटले की, “बीसीसीआयने आयपीएल दरम्यान खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडू नयेत म्हणून १० कोटी रुपयांचे बजेट बनवले आहे. बीसीसीआय खेळाडूंच्या एकूण २० हजार कोरोना चाचणी करणार आहे. बीसीसीआयला एका चाचणीचा २०० दिरहॅम खर्च येईल, यावर कसलाही कर लावण्यात आलेला नाही. चाचणी करण्यासाठी आम्ही युएईच्या व्हीपीएस हेल्थकेअर कंपनीला यासाठी नियुक्त केले आहे. त्यांचे ७५ कर्मचारी या कामासाठी निवडण्यात आले आहेत. हेल्थकेअर कंपनीने खास या कामासाठी त्यांची निवड केली आहे.”
हे सर्व हेल्थकेअर कर्मचारी एका वेगळ्या हॉटेलमध्ये राहतात. त्यांच्यासाठी कंपनीने वेगळे जैव सुरक्षित वातावरण बनवले आहे. कंपनीचे ५० कर्मचारी खेळाडूंची कोरोना चाचणी करतात. तर उर्वरित २५ कर्मचारी प्रयोगशाळा आणि अहवाल तयार करण्याचे काम सांभाळतात. तरी, बीसीसीआय त्यांच्या जैव सुरक्षिततेचा खर्च करत नाही. कारण ही जबाबदारी हेल्थकेअर कंपनीची आहे. आयपीएलचे सर्व संघ युएईला पोहोचल्यापासून ते २८ ऑगस्टपर्यंत तब्बल १९८८ चाचण्या झाल्या आहेत, यात खेळाडू आणि सहकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात होणार आहे. ५३ दिवस चालणाऱ्या या लीगचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तुम्ही इथे मजा मस्ती करायला नाही, आयपीएल खेळायला आलाय,’ विराट कोहली संतापला
‘सुरेश रैनासाठी पैसा महत्त्वाचा नाही’, दिग्गजाची सीएसकेच्या संघमालकावर कडाडून टीका
रैनाच्या गैरहजरीत गंभीरचा धोनीला सल्ला, म्हणतोय आता तू…
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल
आयपीएलमधील ५ अशा टीम, ज्यांनी खेळाडूंवर खर्च केलाय पाण्यासारखा पैसा
आयपीएलमध्ये ‘या’ ५ खेळाडूंना मिळाले क्षमतेपेक्षाही अधिक पैसे, पण कामगिरीच्या बाबतीत मात्र…