आजपासून(८ जूलै) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज द रोज बॉल स्टेडियम, साऊथँप्टन येथे खेळवण्यात येत असून या सामन्यात बेन स्टोक्स इंग्लंड संघाचे नेतृत्व करत आहे.
इंग्लंडचा नियमित कर्णधार जो रुट त्याच्या मुलीचा नुकताच जन्म झाल्याने या सामन्यात खेळत नसल्याने बेन स्टोक्स या सामन्यात इंग्लंडचे प्रभारी कर्णधारपद सांभाळत आहे. तो पहिल्यांदाच इंग्लंडचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे तो इंग्लंडचा ८१ वा कसोटी कर्णधार ठरला आहे. तसेच जगातील एकूण ३३८ वा कसोटी कर्णधार ठरला आहे.
Introducing our 81st Test captain @benstokes38 🏴🏏 pic.twitter.com/xEbiBSwMYd
— England Cricket (@englandcricket) July 7, 2020
आत्तापर्यंत १२ देशाचे संघांना कसोटीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे १२ देशांचे मिळून आत्तापर्यंत ३३८ कर्णधार झाले आहेत. यामध्ये इंग्लंडचे सर्वाधिक ८१ कर्णधार झाले आहेत. तर त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया असून त्याचे आत्तापर्यंत ४६ कर्णधार झाले आहेत. सर्वाधिक कसोटी कर्णधार लाभलेल्या संघांमध्ये भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचे आत्तापर्यंत ३३ कर्णधार झाले आहेत.
वरिष्ठ स्तरावर स्टोक्सचा कर्णधार म्हणून पहिला सामना –
विशेष गोष्ट म्हणजे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघाच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व करत असलेल्या बेन स्टोक्सने याआधी कधीही वरिष्ठ स्तरावर कोणत्याही संघाचे नेतृत्व केलेले नाही. त्याने केवळ याआधी नुकतेच इंग्लंडच्या सराव सामन्यादरम्यान बीए स्टोक्स इलेव्हन संघाचे नेतृत्व केले होते. पण तो सराव सामना होता.
त्याआधी त्याने १२ वर्षांपूर्वी जूलै २००८ ला १७ वर्षांखालील डर्हम संघाचे १७ वर्षांखालील यॉर्कशायर संघाविरुद्ध नेतृत्व केले होते.
सर्वाधिक कसोटी कर्णधार लाभलेले संघ –
८१ -इंग्लंड
४६ – ऑस्ट्रेलिया
३७ – वेस्ट इंडिज
३६ – दक्षिण आफ्रिका
३३ – भारत
३२ – पाकिस्तान
३० – न्यूझीलंड
१७ – श्रीलंका
१२ – झिम्बाब्वे
११ – बांगलादेश
२ – अफगाणिस्तान
१ – आयर्लंड
ट्रेंडिंग घडामोडी –
नाही होणार भारत पाकिस्तान ऐतिहासिक लढत, ही महत्त्वाची स्पर्धा झाली रद्द
कोरोनामुळे क्रिकेटमध्ये होतं आहेत कहर विक्रम, आज तर पहिल्या कसोटी दरम्यान…
तब्बल ११७ दिवसांनी सुरू झाले क्रिकेट; २५ वर्षात पहिल्यांदाच नाही दिसणार इंग्लंडचा १२वा खेळाडू