आयपीएल 2024 स्पर्धेचं रणशिंग फुंकलं असून जेतेपदासाठी पुढचे दोन महिने दहा संघ भिडणार आहेत. असं असताना काही संघांना स्पर्धेआधीच दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे आयपीएलच्या 17 व्या पर्वात संघांना फटका बसणार आहे. तत्पूर्वी स्पर्धा सुरु होण्याच्या चार दिवसाआधी सनरायझर्स हैदराबादला धक्का बसला आहे. तसेच हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा आहे.
याबरोबरच सनरायझर्स हैदराबाद 23 मार्चपासून आयपीएल 2024च्या मोहीमेला कोलकाता नाईट रायडर्स सोबत सुरवात करणार आहे. त्याआधी सनरायझर्स हैदराबादच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण बांगलादेश आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार असून यामध्ये त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी हसरंगाने आपली कसोटी निवृत्ती देखील मागे घेतली आहे. तसेच ही कसोटी मालिका 22 मार्चपासून सुरू होणार असून मालिकेतील शेवटचा सामना 30 मार्च रोजी होणार आहे.
यावेळी आयपीएल 2024 देखील सुरू होणार आहे, ज्यामुळे पहिल्या काही सामन्यांमध्ये वानिंदू हसरंगा सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग नसणार आहे. तसेच वानिंदू हसरंगा हा आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा एक भाग होता. त्यानंतर RCB ने IPL 2024 च्या आधी हसरंगा सोडले होते. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 च्या लिलावात हसरंगाला 1.5 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
Wanindu Hasaranga is coming out of retirement to play in the Bangladesh Test series.
Set to join SRH in IPL 2024, there's concern he might miss initial matches if he joins IPL after the test series, potentially upsetting SRH plans. #BANvsSL #WaninduHasaranga pic.twitter.com/NbSLaGdZH8
— Raisul Rifat (@raisul_rifat88) March 18, 2024
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदाची धुरा ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कॅप्टन पॅट कमिन्सकडे सोपवली आहे. न्यूझीलंडने माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. 2016 मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्स संघाचे नशिब यावेळच्या बदलांमुळे बदलणार का? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.
आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादचा संघ पुढीलप्रमाणे –
अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम , मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्रसिंग यादव, उमरान मलिक, नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.
महत्वाच्या बातम्या –
- “मी जानेवारीतच तंदुरुस्त झालो होतो, परंतु….”, ठीक होऊनही एकही सामना का खेळला नाही हार्दिक पांड्या?
- IPL 2024 : नवीन कर्णधार, अन् वेगवान गोलंदाजांचा मारा, पाहा सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग 11