भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी (दि. 07 जुलै) मुंबई येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बीसीसीआयने भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघांना आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भाग घेण्याची परवानगी दिली आहे. यावर्षी चीनमध्ये 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार आहे.
विशेष म्हणजे, भारतीय महिला संघ (Indian Women Team) 19 सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मधील (Asian Games 2023) आपल्या अभियानाची सुरुवात करतील. तसेच, भारतीय पुरुष ब संघ 28 सप्टेंबरपासून स्पर्धेतील अभियानाची सुरुवात करेल. यापूर्वी दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खेळाला सामील करण्यात आले होते.
बीसीसीआय बनवणार पुरुषांचा ब संघ
माध्यमांतील वृत्तांनुसार, बीसीसीआयने व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे पुरुषांचा ब संघ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की, महिला आणि पुरुष श्रेणीत विजय मिळवण्यासाठी सर्वोत्तम संघ उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुरुष आणि महिला संघ घेणार भाग
बीसीसीआयने एका पत्रकात म्हटले की, व्यस्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक पाहता आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये संघ उतरवणे कठीण जाईल. पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघ सुवर्णपदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार असेल. बोर्डाने म्हटले की, “प्रभावी नियोजन, दळणवळण आणि समन्वयाद्वारे भारत सरकारच्या निर्देशांनुसार पुरुष आणि महिला संघ उभे करायचे. तसेच, आव्हाने यशस्वीपणे पेलण्याचे आणि राष्ट्रीय हितासाठी योगदान देण्याचे बीसीसीआयचे उद्दिष्ट आहे.”
दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश
खरं तर, क्रिकेट हा खेळ दोन वेळा 2010 आणि 2014 यादरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धांचा भाग होता. मात्र, भारताने इतर वचनबद्धतेमुळे दोन्ही वेळा एकही संघ पाठवला नव्हता. पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये बांगलादेश आणि श्रीलंका संघांनी प्रत्येकी 1 सुवर्णपदक जिंकले आहे, तर पाकिस्तानने महिलांच्या स्पर्धेतील दोन हंगाम आपल्या नावावर केले आहेत. (big news bcci board approved participation indian men and women teams for asian games read)
महत्वाच्या बातम्या-
करियरचा 100वी कसोटी स्मिथनं यादगार बनवलीच! फिल्डिंर म्हणून कोरलं इतिहासात नाव
कमिन्सच्या भेदक माऱ्यापुढे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला इंग्लंडचा डाव, ऑस्ट्रेलियाकडे 26 धावांची आघाडी