इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाला अजून काही महिने वेळ बाकी आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघआने अप्रतिम प्रदर्शन केले. पण अंतिम सामन्यात संघ कमी पडला आणि ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले. दुसरीकडे इंग्लंडसारखा बलाढ्य संघ देखील विश्वचषकात पूर्णपणे अपयशी ठरला. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स याच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
बेन स्टोक्स मागच्या आयपीएल हंगामात एमएस धोनी याच्या नेतृत्वात खेळला होता. मागच्या वर्षीचा आयपीएल विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज यांचे स्टोक्सने प्रतिनिधित्व केले. सर्वात जास्त 16.25 कोटी रुपयांची बोली लावून सीएसकेने त्याला संघात घेतले होते. पण आता हा महागडा खेळाडू आगामी आयपीएल हंगामात सीएसकेची साथ देणार नाहीये. स्टोक्सने आगामी आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे.
इंग्लंड संघ पुढच्या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर असणार आहे. याठिकाणी भारत आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. आयपीएलआधी होणारी ही महत्वाची मालिका आणि जून 2024 मध्ये टी-20 विश्वचषक खेलवला जाणार आहे. या व्यस्त वेळापत्रकाचा विचार करून चेन्नई सुपर किंग्ज म्हणजेच सीएसकेने स्टोक्सचा निर्णयाचे समर्थन केले आहे. अशात आगामी आयपीएलमध्ये सीएसकेला स्टोक्सची जागा भरण्यासाठी दुसऱ्या एखाद्या विदेशी खेळाडूवर बोली लावावी लागणार, हे स्पष्ट झाले. पुढच्या महिन्यात आगामी आयपीएल हंगामासाठी मिनी लिलाव आयोजित केला जाणार आहे.
“इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स वर्कलोड आणि फिटनेसवर काम करण्यासाठी आयपीएल 2024 मधून माघार घेत आहे,” अशी माहिती चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या निवेदनात सांगितले गेले आहे. 32 वर्षीय स्टोक्स आयपीएल 2023आधी चेन्नई सुपर किंग्जमध्ये सहभागी झाला होता. त्याने नुकतेच वनडे विश्वचषक 2023 इंग्लंडसाठी सहभाग नोंदवला. विश्वचषकासाठी त्याने वनडे क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती देखील मागे घेतली.
दरम्यान, मागच्या वर्षी स्टोक्स सीएसकेचा महत्वाचा खेळाडू होता. पण संघासाठी त्याने काही खास योगदान दिले नाही. संपूर्ण हंगामात त्याने फक्त दोन सामने खेळले. यात एकदा 8 आणि एकदा 7 धावांची खेळी केली. तसेच हंगामात टाकेलल्या एका षटकात 18 धावा खर्च केला. दुखापतीच्या कारणास्तव स्टोक्सने हंगामातील इतर सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. अंतिम सामन्याआधीच त्याने मायदेशात जाण्याचा निर्णय देखील घेतला होता. (Big news! Stokes pulls out of IPL after poor World Cup, know why)
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचे वर्ल्डकपचे स्वप्न भंगल्यानंतर ममता बॅनर्जींचा मोठा दावा; म्हणाल्या, ‘…तर भारत जिंकला असता’
‘एका महिन्यात तो पुन्हा हसेल’, वर्ल्डकप गमावल्यानंतर रोहितच्या लाडक्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल