भारतीय क्रिकेटमधून सध्याच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. जे की भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. टीम इंडियाच्या गब्बरने सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्याने आभार मानले आहे.
क्रिकेटच्या मैदानावर गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली. धवनने डिसेंबर 2022 मध्ये एकदिवसीय फॉर्मेटमध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता, त्यानंतर तो सतत संघाबाहेर होता. पण धवन आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसणार आहे. कारण त्याने व्हिडिओमध्ये आयपीएलमधून निवृत्तीबद्दल काहीही सांगितलेले नाही.
निवृत्तीची घोषणा करताना, शिखर धवनने ‘एक्स’वर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने लिहिले, “मी माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय बंद करत असताना, मी माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि प्रेम घेऊन जात आहे. प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद! जय हिंद!”
As I close this chapter of my cricketing journey, I carry with me countless memories and gratitude. Thank you for the love and support! Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/QKxRH55Lgx
— Shikhar Dhawan (@SDhawan25) August 24, 2024
शिखर धवनच्या क्रिकेट करिअरबाबत बोलायचे झाल्यास, गब्बरने ऑक्टोंबर 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वनडे फाॅरमॅटमधून भारतासाठी पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी 34 कसोटी सामने खेळला आहे. ज्याच्या 58 डावात त्याने 2315 धावा केल्या आहेत. तर 167 वनडे सामन्यात त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केला आहे. ज्यामध्ये त्याने 17 शतके आणि 39 अर्धशतकांच्या जोरावर 6793 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटबाबात बोलायचे झाल्यास त्याने 68 सामने खेळल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 1759 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 11 अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा-
विराटची जर्सी 40 लाखांना विकली, धोनी-रोहितच्या बॅटवरही लिलावात बंपर बोली
VIDEO: रिझवाननं फेकली बाबरच्या अंगावर बॅट, पाकिस्तानी खेळाडूंचा मैदानातच गोंधळ
काँग्रेसमध्ये सामील होणार विनेश फोगट? भूपिंदर सिंह हुड्डानं केलं मोठं वक्तव्य!