बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये एकमेव कसोटी खेळली जात आहे. तर, या सामन्यामध्ये बांगलादेशचा युवा फलंदाज नजमुल हुसेन शांतोने 146 धावांची खेळी खेळून आगळा वेगळा इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत शतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. तसेच, हुसेन शांतोने 24 व्या वयामध्ये शतक झळकावून हा विश्वविक्रम केला आहे.
23 चौकार आणि 2 षटकार मारले
हुसेनच्या आधी अफगाणिस्तानविरुद्ध 5 फलंदाजांनी शतके झळकावली आहेत. हे सर्व खेळाडू 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. तर, हुसेनने पहिल्या डावात 146 धावा केल्या. यादरम्यान त्याने आपल्या बॅटने 23 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.
दुसऱ्या विकेटसाठी केली विक्रमी भागीदारी
पहिली विकेट झटपट पडल्यानंतर नजमुल हुसैन शांतो (Najmul Hossain Shanto) आणि महमुदुल हसन जॉय (Mahmudul Hasan Joy) यांनी पहिल्या डावात बांगलादेशसाठी दुसऱ्या विकेटसाठी 212 धावांची विक्रमी भागीदारी केली. याआधी 2014 साली श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत इमरुल कायस आणि शमसुर रहमान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 232 धावांची भागीदारी केली होती. जी बांगलादेशकडून कसोटीत दुसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम देखील आहे.
STUMPS ????
Najmul Hossain Shanto’s fantastic 146 steers Bangladesh to 362 for five on the opening day in Mirpur!#BANvAFG SCORECARD ▶️ https://t.co/1Ju7TtsN7J pic.twitter.com/39TmOG2vD6
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 14, 2023
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत शतक झळकावणारे फलंदाज
मुरली विजय (भारत) – 35 वर्षे (अंदाजे), 2018
शिखर धवन (भारत) – 32 वर्षे (अंदाजे) 2018
शामर ब्रूक्स (डब्ल्यूआय) – 30 वर्षे (अंदाजे), 2019/20
शॉन विल्यम्स (झिम्बाब्वे) – 34 वर्षे (अंदाजे), 2020/21
सामन्याची स्थिती
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बांगलादेश (Bangladesh) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यातील हा सामना शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. तसेच, पहिल्या डावात नजमुल आणि महमुदुल यांच्या शानदार खेळीच्या जोरावर बांगलादेशने आपली स्थिती मजबूत केली. बांगलादेशने पहिल्या डावात 382 धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे, अफगाणिस्तानसाठी निजात मसूदने पहिल्या डावात 5 बळी घेतले.
महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा