---Advertisement---

‘यामुळे होतेय गोलंदाजी करण्यास अडचण’, बुमराहने सांगितले कारण

On: शुक्रवार, फेब्रुवारी 5, 2021 10:46 PM
---Advertisement---

चेन्नई येथे आजपासून (५ फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड संघामध्ये बहुचर्चित ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. पाहुण्या इंग्लंडने शानदार फलंदाजी करत पहिला दिवस गाजवला. इंग्लंडने पहिल्या दिवशीच ३ बाद २६३ उभारल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने लाळेशिवाय चेंडूची चमक राखणे कठीण जात आहे, असे म्हटले.

लाळेवर बंदी आणणे गोलंदाजांच्या तोट्याचे

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह पत्रकारांना सामोरा गेला. त्याने पत्रकारांशी बोलताना म्हटले, “स्पष्ट सांगायचे झाले तर लाळेशिवाय चेंडूची चमक राखणे गोलंदाजांसाठी कठीण बनले आहे. भारतात चेंडूचा आकार लवकर बदलत असतो. त्यामुळे चेंडूचा एक भाग चमकवणे आवश्यक असते. चेंडू काही वेळातच मऊ पडला होता. घामाने चेंडूला आपण चमकवू शकत नाही. उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी उत्कृष्ट पर्याय वापरून चेंडू चमकावावा लागत आहे.”

कोरोना महामारीमुळे क्रिकेटमध्ये लाळ वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. त्याऐवजी चेंडू घासून किंवा घामाने चमकावावा लागत आहे.

पहिल्या दिवशी इंग्लंडने गाजवले वर्चस्व

भारत व इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाहुण्या इंग्लंड संघाने वर्चस्व गाजवले. कर्णधार जो रूटने नाबाद शतक झळकावले तर युवा सलामीवीर डॉम सिबलीने ८७ धावांची झुंजार खेळी केली. दिवसाखेर इंग्लंडची धावसंख्या ३ बाद २६३ इतकी झाली आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन तर रविचंद्रन अश्विनने एक बळी मिळविला.

महत्वाच्या बातम्या:

स्टार्क नाही ठरणार आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू, हे आहे कारण

Video : पंतने यष्ट्यांमागून गाजवला कसोटीचा पहिला दिवस, केले चाहत्यांचे मनोरंजन

शेतकरी आंदोलन: वातावरण तापलं! केरळमध्ये सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर ओतला काळा रंग

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---